सुप्रसिध्द फिल्ममेकर यश चोप्रा यांच्या ‘यश राज फिल्म्स’ अंतर्गत आतापर्यंत अनेक ब्लॉबस्टर आणि सुपरहिट चित्रपट सिनेसृष्टीला देण्यात आले आहेत. तर ‘फादर ऑफ रोमान्स’ म्हणून ओळखले जाणारे यश चोप्रा यांच्या बाबतीत खूपच कमाल गोष्ट समोर आली आहे.
यश चोप्रा यांच्या आयुष्यावर आधारित “द रोमँटिक्स” ही सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ही सीरिज नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. नुकताच या सीरिजचा ट्रेलर नेटफ्लिक्सच्या सोशल मीडियावरून शेअर करण्यात आला आहे.
द रोमँटिक्सच्या ट्रेलरमध्ये दाखवल्याप्रमाणे अमिताभ बच्चन, सलमान खान, शाहरुख खान, रणवीर सिंह, रणबीर कपूर आणि राणी मुखर्जी या कलाकार मंडळींनी यश चोप्रा यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच आणखी एक खास बाब म्हणजे या ट्रेलरमध्ये यश चोप्रा यांचा मुलगा आदित्य चोप्रा याचा देखील आवाज ऐकू येत आहे.
या सीरिजमध्ये अनेक नवनवीन गोष्टींचा खुलासा होणार हे नक्की. तसेच प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे यश चोप्रा यांना ‘फादर ऑफ रोमान्स’ म्हणून का ओळखले जाते याचे खरे कारण या सीरिजमधून समोर येणार आहे. तर ही सीरिज येत्या १४ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सीरिजचं दिग्दर्शन हे स्मृती मुंध्रा यांनी केले आहे.
त्यामुळे आता यश चोप्रा यांचा चाहतावर्ग त्यांच्यावरील या सीरिजची खूपच आतुरतेने वाट पाहत आहेत.