अभिनेत्री अलका कुबल-आठल्ये यांनी गेली अनेक वर्ष आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे. सोशिक व आदर्श सून म्हणून त्यांची मराठी चित्रपटसृष्टीत ओळख आहे. त्यांना दोन मुली आहेत. परंतु आईच्या पावला वर पाउल न ठेवता दोघींनी वेगवेगळा मार्ग निवडला.
अलका कुबल यांचा चाहतावर्ग देखील खूप मोठा आहे. त्या सोशल मिडिया वरून नेहमीच आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल घडणाऱ्या सर्व गोष्टी चाहत्यांना सांगत असतात. काही वर्षापूर्वी त्यांची मोठी मुलगी ईशानी ही पायलट झाली, ती आता वैमानिक म्हणून कार्यरत आहे. आता अलका कुबल यांच्या धाकट्या मुलगी कस्तुरीने सुद्धा अभिमानास्पद कामगिरी करत आपल्या क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे.
अलका कुबल यांची धाकटी मुलगी परदेशात एमबीबीएस करत होती, तिला डर्मिटोलॉजिस्ट बनायचं आहे. आता कस्तुरीने डॉक्टरची पदवी प्राप्त केली आहे. अलका यांनी ही बातमी त्यांच्या सोशल मिडिया वरून शेअर केली आहे. “कस्तुरीने पहिल्याच प्रयत्नात FMGE परवाना परीक्षा यशस्वीपणे पास केली. आज पासून Dr. Kasturee Athalye. आम्हाला तुझा खूप अभिमान वाटतो. तुला खूप शुभेच्छा.” असे कॅप्शन देत त्यांनी आपल्या मुलीचे यश आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
त्यांच्या या पोस्टवर त्यांचे चाहते आणि सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी कस्तुरीचं आणि आठल्ये कुटुंबीयांचं अभिनंदन करत आहेत.