हॉरर कॉमेडी शो ‘प्रीतम प्यारे और वो’ मध्ये प्रमुख भूमिका साकारणारा कॉमेडियन सिद्धार्थ सागर. सिध्दार्थने उस्ताद, घरचोरदास तसेच त्याच्या कारकिर्दीत फनवीर सिंह अशी वेगवेगळी ओळख मिळवून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे.
संपूर्ण देशभरात आठवड्याच्या शेवटच्या दिवसात सहकुटुंब-सहपरिवार पाहिला जाणारा शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो‘. सर्वांचे मनोरंजन करणारा आणि प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा हा शो. जेवढा हा शो प्रेक्षकांच्या जवळचा आहे तेवढेच प्रेक्षकांना जवळचे वाटतात त्या शोमधले कलाकार.
आपल्या उत्कृष्ट शैलीने, विनोद बुद्धीने आणि बुध्दी चातुर्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा कलाकार लोकप्रिय कॉमेडियन सिद्धार्थ सागर यांच्याबद्दल एक खळबळ जनक वृत्त समोर आले आहे. तो कपिल शर्मा शोमधून बाहेर पडण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीमध्ये त्याने यावर उत्तर दिले की, “ज्या चर्चा सध्या चालू आहेत तसं काहीही नाही, या या सर्व बातम्या खोट्या आहेत.”
पण जेव्हा त्याला विचारण्यात आले की तो शूटिंग करत आहे का तर यावर त्याने अगदी स्पष्टपणे उत्तर दिले की,” शोच्या मागील काही भागांसाठी मी शूट केलेलं नाही परंतू या शोच्या टीमसोबत चर्चा सुरू आहे आणि आतापर्यंत त्यांच्याकडून कोणतेही ठाम उत्तर मिळाले नाही.”
तर आताच्या माहितीप्रमाणे सिद्धार्थ आणि कपिल शर्मा यांच्यात आर्थिक बाबींवरून वाद सुरू होता. सिद्धार्थने त्याचे मानधन वाढवून देण्याची मागणी कपिल शर्मा कडे केली होती, परंतू त्याने ती फेटाळली. यामुळेच सिद्धार्थने शोला लवकरच निरोप देण्याचा निर्णय घेऊ शकतो.
पण या सर्व प्रकारामुळे सिद्धार्थ सागर आणि द कपिल शर्मा शोचे चाहते मात्र नाराज झाले आहेत.