आजच्या या तरुण पिढीला प्रेरणा देणारी मराठमोळी मुलगी म्हणजेच युट्यूबर प्राजक्ता कोळी.
यश कोणाला नको असतं ? सर्वांनाच हवं असतं. पण ते मिळवण्यासाठी धडपड करणारे फार कमी असतात. फील्ड कोणतीही असो कष्ट करून आपले स्वप्न कसं पुर्ण करता येईल हे आपल्या हातात असतं. तर आजच्या या तरुण पिढीला प्रेरणा देणारी मराठमोळी मुलगी म्हणजेच युट्यूबर प्राजक्ता कोळी.
युट्यूबर प्राजक्ताने फक्त युट्यूबवरचं नाही तर सोशल मीडिया, बॉलिवूड आणि जगभरात फार कमी काळातच तिची ओळख निर्माण केली आहे. मध्यमवर्गीय घरात वाढलेली प्राजक्ताने मास मीडिया मधून पदवी पूर्ण केली. त्यांनतर तिला रेडीओ जॉकी व्हावे अशी इच्छा होती म्हणून ती ते काम करूही लागली. पण रात्रीच काम असल्यामुळे तिचं त्यात मन रमत नव्हतं.
युट्यूब प्रवास
तेव्हा तिला तिच्या शुभचिंतकाकडून युट्यूब चॅनेल सुरू करून ते एक्सप्लोर करण्याचा सल्ला दिला गेला. हीही कल्पना तिला करियर म्हणून आवडली नाही पण एक प्रयत्न म्हणून तिने २०१५ साली ‘MostlySane’ हे युट्यूब चॅनेल सुरु केले. लोकांचा मिळणारा प्रतिसाद पाहून तिला हे काम करण्यात आणखीनच आनंद वाटू लागला अन् पाहता पाहता ती सेलिब्रिटी झाली.
प्राजक्ताने नुकतचं प्रदर्शित झालेल्या जुग जुग जिओ या सिनेमामाधेही काम केले आहे. तसेच आता युनायटेड नेशन्समध्ये तिनं भारताचं प्रतिनिधीत्वही केलं आहे. त्यामुळे तिचा प्रचंड मोठा चाहतावर्ग देखील आहे. त्यामुळे ती बरीच चर्चेतही असते. यावेळी तिच्या चर्चेचं कारण म्हणजे ती सध्या कॅडबरीच्या जाहिरातीत झळकत आहे. ते पाहून तिचे आई-वडील फार भाऊक झाले आहेत. कारण काही वर्षांपूर्वी प्राजक्ताचे वडील कॅडबरी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये काम करत होते. त्यामुळे तिच्या आयुष्यातील हा खास क्षण तिने तिच्या चाह्त्यांसोबत शेअर केला आहे.
View this post on Instagram
कॅडबरीच्या जाहिरातीच्या पोस्टरसोबत तिचे आणि तिच्या आई-वडिलांचे फोटो शेअर करत लिहिले की,
“मी पाच वर्षाची असताना बाबा कॅडबरी कंपनीच्या कॅन्टीनमध्ये डबल शिफ्ट करायचे. आजही बाबा जेव्हा किचनमध्ये काम करत असतात तेव्हा आम्ही म्हणतो की, तुम्ही तर खूपच फास्ट आहात, तेव्हा ते म्हणतात की, ‘अगं, माझ्याकडं शांत बसायला वेळ नाही. खूप लोकांना खायला घालायचं आहे.
कॅन्टीन कामगार आहे मी..’ मला चांगलं शिक्षण मिळावं, चांगलं खायला मिळावं, मला स्वप्नं पाहता यावीत, यासाठी आई-बाबांना कष्ट कराताना मी पाहिलंय. वाट्टेत त्या नोकऱ्या केल्या त्यांनी. पण बाबा कॅडबरी कंपनीत नोकरी करायचे तेव्हाचा काळ आमच्यासाठी खूप खास राहिल.
प्रत्येक दिवाळीला कंपनीतून बोनससोबत मिळणारा चॉकलेट ट्रे…आजही तितकास खास वाटतो. बाबांच्या चेहऱ्यावर काल रात्री हसू पाहिलं. मला कॅडबरीच्या होर्डिंगवर पाहून आई-बाबांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद पाहिलाय.त्यांचा हा आनंद नेहमीच खास असणार आहे.”
तिच्या या पोस्टवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. तर फक्त तिचे चाहतेच नाही तर सिनेसृष्टीतील अनेक कलाकारही कमेंट करताना दिसत आहेत.