बिग बॉसचा एक सिझन १०० दिवसांचा जरी असला तरी त्यातील राडे, ट्रॉफीचा मानकरी आणि काही खास क्षण स्पर्धेतील स्पर्धकांपासून ते अगदी चाहत्यांच्याही लक्षात राहतात. असाच एक क्षण म्हणजे १२ फेब्रुवारीला पार पडलेला ‘बिग बॉस १६‘चा शेवटचा दिवस म्हणजेच या सिझनचा ग्रँड फिनाले.
बिग बॉसचा १६वा सिझन चांगलाच गाजला, त्याचे कारण म्हणजे यंदाच्या जबरदस्त आणि हटके स्पर्धकांमुळे. अखेरीस यांच्या या शर्यतीतून एमसी स्टॅन, शिव ठाकरे, अर्चना गाैतम आणि प्रियंका चाैधरी हे पाच सदस्य पुढे जात ट्रॉफीपासून काही पाऊलांच्या अंतरावर होते. परंतू शिव ठाकरे आणि एमसी स्टॅन या दोघांनी बिग बॉसच्या घराचे दिवे बंद करत निरोप घेतला. तर एमसी स्टॅनने बिग बॉस १६च्या ट्रॉफीवर आपले नाव कोरले.
View this post on Instagram
एमसी स्टॅन आज कितीही मोठा असला तरी तो एका गरीब कुटुंबातील मुलगा आहे. तो त्याच्या लहानपणी पुण्यातील ताडीवाला रोडवर राहत होता. तर सध्या तो मुंबईमध्ये राहत आहे. पण आज मात्र तो यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचला आहे. एमसी स्टॅन हा जगप्रसिद्ध रॅपर आणि हिप-हॉप गायक आहे. तो इयत्ता आठवीमध्ये शिकत असतानाच त्याला रॅप साँगचे वेड लागले होते. त्यामुळे त्याच्या भावाने त्याच्या आवडीप्रमाणे रॅप साँगचे शिक्षण दिले.
यात आणखी नवनवीन गोष्टी शिकत त्याने रॅप साँग लिहायला देखील सुरुवात केली आणि हळूहळू तो प्रसिद्धीच्या झोतात येऊ लागला. एमसी स्टॅन हा लोकप्रिय अमेरिकन रॅपर एमिनेचा चाहता आहे, एमिनेला त्याच्या चाहत्यांनी स्टॅन हे नाव दिले. त्यावरूनच एमसी स्टॅनने स्वतःच खरं नाव बदलून एमसी स्टॅन असे ठेवले.
एमसी स्टॅनचे वडील रेल्वेमध्ये हवालदार म्हणून काम करत आहेत, तर त्याची आई गृहिणी आहे. बिग बॉस १६चं विजेतेपद मिळाल्यामुळे तो आणखीनच चर्चेत आला आहे. विजेतेपदाची घोषणा झाल्यावर तो १५ वर्षांपूर्वी राहत असलेल्या ताडीवाला रोड भागात चांगलाच जल्लोष झाला.
तसेच सध्या सर्वत्रच त्याच्याच नावाची चर्चा आहे आणि सर्व क्षेत्रातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.