नुकतच ‘हेरा फेरी ३’ च्या शुटींगला सुरवात झाली आहे. पहिले दोन भाग अक्षय कुमार, सुनील शेट्टी आणि परेश रावल या त्रिकुटाने चांगलेच गाजवले होते. चित्रपटाच्या तिसऱ्या भागात कार्तिक आर्यन दिसणार होता, परंतु काही दिवसांपूर्वी अक्षय कुमारच ही भूमिका साकारणार असल्याच समोर आल. त्यामुळे चाहते प्रचंड खुश आहेत, सगळे अगदी उत्सुकतेने या चित्रपटाची वाट बघत आहेत. आता या चित्रपटाच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे.
हेरा फेरी ३ बद्दल मोठी अपडेट काही दिवसांपूर्वी समोर आली ती म्हणजे यंदाच्या भागात संजय दत्त आणि अर्शद वारसी सहभागी असणार आहेत. आता संजय दत्त यांच्याबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे संजय दत्त हेरा फेरी ३ मध्ये एक धम्माल भूमिका साकारणार आहेत. हि भूमिका कोणती हे जाणून घेतल्यावर तुम्हाला नक्कीच आनंद होईल. हि भूमिका म्हणजे तोतला गॅंग. तोतला गॅंग तुम्हाला आठवत असेल. हेरा फेरी २ मध्ये असलेल्या या गॅंगने बोबडं बोलल्यामुळे सर्वांची हसून हसून पुरेवाट लावली.
आता याच तोतला गॅंगमध्ये संजय दत्त सहभागी होणार आहे. तोतला गॅंग मध्ये जो रवी किशन असतो त्याच्या मोठया भावाच्या भूमिकेत संजय दत्त दिसणार आहे. त्यामुळे संजय दत्त तोतला गॅंगमध्ये सहभागी होऊन बाबूभैय्या, राजू आणि श्यामला जेरीस आणणार यात शंका नाही. हेरा हेरी ३ मध्ये बाबाची एन्ट्री होणार हे समजताच चाहते आणखीनच उत्सुक झाले आहेत.