पुढचं पाऊल, दुर्वा, का रे दुरावा आणि आता चालू असणारी लोकमान्य या मालिकांमधून घराघरांत पोहोचलेला अभिनेता म्हणजे सुयश टिळक. सुयशला मिळणाऱ्या शांत, साध्या भूमिकेतून त्याने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत. तो सोशल मीडियावर देखील नेहमीच सक्रीय असतो.
सुयशने नुकतीच एक पोस्ट रिपोस्ट केली आहे. त्यामध्ये सुयशचा एक नवीन लूक पाहायला मिळत आहे. ज्यामध्ये त्याने शर्ट, लुंगी, खांद्यावर उपरणे आणि कपाळावर टिळा लावत त्याने दक्षिणात्य पेहराव केला असून त्यात तो खूपच छान दिसत आहे.
सुयशचा हा लूक शूटींग दरम्यान आहे. तर तो आता सोनी मराठी वाहिनीवरील ‘जिवाची होतीया काहिली’ या मालिकेत दिसणार आहे. ही मालिका मराठी मुलगा आणि कानडी मुलगी यांच्या लव्हस्टोरीवर आधारित आहे. यातील मराठी मुलाची भूमिका अभिनेता राज हंचनाळे (अर्जुन) आणि कानडी मुलीची भूमिका अभिनेत्री प्रतीक्षा शिवणकर (रेवथी) हिने साकारली आहे.
आता ही मालिका रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. अर्जुन आणि रेवथी यांच्यातील मैत्री आता प्रेमात बदलली आहे. परंतू दुसरीकडे मोठं संकट त्यांचं दार ठोठावत आहे आणि ते संकट म्हणजे कार्तिक देवराज. कार्तिक देवराजच्या भूमिकेत सुयश दिसणार आहे. विशेष म्हणजे अशा प्रकारची भूमिका यापूर्वी सुयशने केलेली नाही. त्यामुळे त्याला नकारात्मक भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग फारच उत्सुक आहे.
तर त्याच्या एंट्रीने मालिका कोणतं वळण घेणार हे पाहणे रंजक ठरेल