आपल्या सर्वांचे आवडते अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर सिनेसृष्टीत नाव कमावले आहे. त्यांनी नाटक , मालिका व चित्रपट अश्या सगळ्याच माध्यमात काम केले आहे. अशी ही बनवाबनवी , आयत्या घरात घरोबा , शेजारी शेजारी , धुमधडाका , साडे माडे तीन हे त्यांचे गाजलेले चित्रपट. त्यांनी मराठी बरोबर हिंदी सिनेसृष्टीतही नाव कमावल. अशोक सराफ व लक्ष्मीकांत बेर्डे ही अभिनय क्षेत्रातील अतिशय गाजलेली जोडी आहे. अशोक सराफ यांची चित्रपटसृष्टीतली ओळख म्हणजे अशोक मामा ! आजही तरुणांना लाजवेल अश्या उत्साहाने अशोकमामा कार्यरत आहेत.
यंदाच्या या पुरस्कार सोहळ्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यंदाचा जीवनगौरव पुरस्कार. अभिनय सम्राट अशोक सराफ हे यावर्षी जीवनगौरव पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत.
झी चित्रगौरव सोहळ्यात अभिनेता सिद्धार्थ जाधव याने नृत्याविष्काराने अशोक सराफ यांचा कलाविश्वातील प्रवास सादर केला. परफॉर्मन्स सादर करून झाल्यानंतर सिद्धार्थ मंचावरून खाली उतरून त्याच्या हातातील फुलांचा हार अशोक सराफ यांना घातला व साष्टांग नमस्कार केला. सिद्धार्थची ही अनोखी मानवंदना पाहून अशोक सराफ व तिथे उपस्थित सर्वजन भारावून गेले. कित्येकांच्या डोळ्यात पाणी आले. सिद्धार्थ जाधव व अशोक सराफ यांच्या अंगावर काटा व डोळ्यात पाणी आणणारा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. सिद्धार्थने हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंट वरून शेअर केला आहे. व त्या व्हिडिओ ला “लव्ह यू अशोक मामा. झी चित्र गौरव पुरस्कार सोहळ्यातील सर्वात सुंदर क्षण…” असं कॅप्शन देत त्याचं प्रेम व्यक्त केलं आहे.