अशोक मामा म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अशोक सराफ यांनी त्यांच्या जीवन प्रवासात अनेक मालिका व चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यांच्या अभिनयाच्या जोरावर त्यांनी अनेक प्रेक्षकांची मने जिंकून घेतली. एका माणसामुळे संपूर्ण इंडस्ट्री ओळखली जाते. मराठी इंडस्ट्री म्हणजे अशोक मामा ज्याच्यात काम करतात ती इंडस्ट्री, असं सुबोध भावे त्यांची ओळख करून देताना म्हणाले होते. या प्रवासात त्यांनी गेल्या ४८ वर्षापासून एक वस्तू जपून ठेवली आहे. ती म्हणजे त्यांच्या मित्राने दिलेली अंगठी.
विजय लवेकर नावाच्या त्यांच्या एका मित्राने त्यांना एक अंगठी भेट म्हणून दिली होती. तिच अंगठी अशोक मामांसाठी लकी ठरली. विजय लवेकर हे त्यावेळी मेकअप आर्टिस्ट म्हणून काम करत होते. त्याचं सोन्या चांदीच एक छोटस दुकान देखील होत. एकदा ते सेटवर आले असता त्यांनी अशोक सराफ यांच्यापुढे बॉक्स ठेवल त्या बॉक्स मध्ये वेगवेगळ्या डिझाइनच्या अनेक अंगठ्या होत्या त्यापैकी एक अंगठी अशोक मामांना त्यांनी घ्यायला सांगितली नटराजाची प्रतिमा असलेली अंगठी त्यांनी घेतली व लगेच बोटात घातली.
अंगठी घालताच त्यांना तिसऱ्या दिवशी पांडू हवालदार हा चित्रपट मिळाला. व एकापाठोपाठ एक चांगल्या भूमिका त्यांच्याकडे चालून आल्या. एकदा एका सिनेमात त्यांना भिकारीची भूमिका करण्यासाठी त्यांच्या दिग्दर्शकाने त्यांना ती अंगठी काडायला सांगितली पण त्यांनी ती अंगठी काढण्यास साफ नकार दिला. अंगठी घातल्या पासून जणू अशोक सराफ याचं नाशीब बद्दल होत. ते म्हणतात कि याला श्रद्धा म्हणा किव्वा अंधश्रद्धा पण तेव्हा पासून अशोक मामांनी ती अंगठी बोटातून काडली नाही.
You May Also Like