बॉलीवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. परिणीती एका राजकीय नेत्याच्या प्रेमात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. परिणीती आणि आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा यांच्यात नेमकं काय चाललंय, याची देशभर चर्चा होत आहे. हे दोघे अनेकदा एकत्र स्पॉट होतात. त्यामुळेच हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. पण त्यावर या दोघांनी अजूनही मौन बाळगलं आहे. पण आता या दोघांच्या नात्याविषयी एक मोठी अपडेट समोर येत आहे.
View this post on Instagram
गेल्या काही दिवसांपूर्वी परिणिती आणि आपचे खासदार राघव चड्ढा मुंबईतील एका रेस्टॉरंटच्या बाहेर डिनरला जाताना दिसले होते, त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी ते लंचसाठी जाताना दिसले. एकाच गाडीतून दोघेही एकत्र या लंच आणि डिनर डेटसाठी जाताना स्पॉट झाले आणि त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांना उधान आलं. हे दोघेही शिक्षणासाठी लंडनमध्ये एकत्र होते, तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. मात्र अद्याप दोघांनीही त्यांच्या रिलेशनशिपविषयी भाष्य केलेले नाही. मात्र मीडिया रिपोर्टनुसार या दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याचे समोर आले आहे. आता हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
मीडिया रिपोर्टनुसार त्या दोघांच्या कुटुंबीयांनी लग्नाबाबत चर्चा सुरु केली आहे. मात्र दोघेही कामात व्यस्त असल्याने अजूनही लग्नाची तारीख ठरली नाही. त्यामुळे आता बॉलीवूडमध्ये कियारा पाठोपाठ आता परीणीतीचा पण नंबर लागणार का ? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.परिणिती आणि राघव या दोघांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये एकत्र शिक्षण घेतेले. दोगेही एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखतात. आता हे दोघे लग्नबंधनात अडकणार का नाही हे पाहणे उत्सुकतेचे आहे.