दाक्षिणात्य अभिनेत्री आणि सगळ्यांची Crush म्हणजेच रश्मिका मंदाना. रश्मिकाचे फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात लाखो चाहते आहेत. ती दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री आहे. ‘पुष्पा’ या चित्रपटामुळे ती चांगलीच चर्चेत आली. रश्मिकाने आता बॉलीवूड मध्ये देखील पदार्पण केले आहे. रश्मिकाने ‘गुडबाय’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या सोबत काम केले आहे.
रश्मिकाने नुकतीच ‘झी चित्र गौरव पुरस्कार’ सोहळ्याला हजेरी लावली होती. या वेळी तिने लावणी देखील सादर केली. तिचा डान्स पाहून सगळेच भारावून गेले होते. रश्मिकाने पहिल्यांदाच लावणी वर ठेका धरला होता, तिने चंद्रा या गाण्यावर लावणी केली.
View this post on Instagram
या वेळी कार्यक्रमाच सूत्रसंचालन निलेश साबळे आणि श्रेयस तळपदे करत होते. या वेळी निलेश साबळेने रश्मिकाला एक प्रश्न विचारला, “तुला मराठी चित्रपटांमध्ये काम करायला आवडेल का?” “चांगली कथा असेल तर नक्कीच करेन.” अस रश्मिका म्हणाली. तीच हे उत्तर ऐकून चाहते देखील खुश झाले आहेत.
View this post on Instagram
त्यामुळे रश्मिका मंदाना आता मराठी चित्रपटात दिसणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. चाहते देखील तिला मराठी चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत.