आपण अनेक मालिका पाहतो त्यापैकी एक मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही आहे. छोट्या पडद्यावरील खूप कमी वेळात लोकप्रिय झालेली ही मालिका आहे. गेल्या १४ वर्षे ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत असल्याने या मालिकेतील कलाकारांवर देखील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं.
या मालिकेतील पात्र कायमच चर्चेत असतात. दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी ही गेल्या ६ वर्षापासून मालिकेत नसल्याने तिचे चाहते तिच्या परतण्याची अगदी आतुरतेने वाट पाहत आहेत.
ती गर्भवती असताना तिने मालिकेतून ब्रेक घेतला होता. अभिनेत्री २०१७ पासून मालिकेपासून लांब असल्याने मालिकेचे निर्माते दिग्दर्शक यांना दयाबेनच्या परतण्याबद्दल प्रश्न विचारले जातात. या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी दयाबेन मालिकेमध्ये कधी परतणार याबाबत खुलासा केला आहे.
दयाबेनच्या परतण्याच्या प्रश्नांची उत्तरे देऊन थकलो असल्याचे असित कुमार मोदी हे सांगतात. दयाबेनची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या दिशा वकानीने तिच्या काही वैयक्तिक कारणांमुळे मालिकेतून ब्रेक घेतला होता.
असित म्हणाले, “मी त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला आहे की, प्रेक्षकांचे प्रेम मिळणे सोपे नसते. लोकांनी आपल्याला खूप प्रेम दिले आहे, त्यामुळे आपल्याला मेहनत करावी लागेल. दिशा वाकाणीची जागा घेणे सोपे नाही. मला स्वतः या शोमध्ये मूळ दया भाभी म्हणजेच दिशा वाकाणीला परत आणायचे आहे. दिशा माझ्या बहिणीसारखी आहे. तिला सध्या कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. जर तिला परत यायचे नसेल तर मी तिला जबरदस्ती करू शकत नाही.”
तारक मेहताच्या शो साठी नवीन दयाबेन च्या शोधात निर्माते आहेत. मात्र दिशा वकानी सारखी व्यक्तिरेखा शोधणे हे खूप कठीण आहे.