‘पठाण’ नंतर सगळीकडे चर्चा सुरु आहे, ती म्हणजे ‘किसी का भाई किसी की जान‘ या चित्रपटाची. सलमान खान चा चित्रपट आहे म्हंटल्यावर चर्चा तर होणारच. सलमानचे फक्त भारतात नाही तर जगभरात चाहते आहेत. त्याच्या चित्रपटाची सगळे उत्सुकतेने वाट पाहत असतात. त्यात शाहरुख खान या चित्रपटात दिसणार आहे हे समजल्यावर प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.
आता नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये सलमानचा खास अंदाज प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला ‘मेरा कोई नाम नहीं है, लेकिन मैं भाईजान के नाम से जाना जाता हूं’ हा सलमानचा डायलॉग ऐकू येत आहे.
View this post on Instagram
21 एप्रिल 2023 रोजी सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमान खानच्या या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. ‘येंटम्मा’, ‘नय्यो लगदा’, ‘बिल्ली बिल्ली’ आणि ‘जी रहे थे हम’ ही किसी का भाई किसी की जान या चित्रपटामधील गाणी प्रेक्षकांच्या भेटील आली आहेत.
किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात सलमान खान आणि पूजा हेगडेसोबतच शहनाज गिल, भूमिका चावला, साऊथ सुपरस्टार वेकेंटश दग्गुबाती, पलक तिवारी, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल हे कलाकार देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. किसी का भाई किसी की जान या चित्रपटात सलमान आणि पूजाची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे.