अनेक मानाच्या पुरस्कारांमधील ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ आणि ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कारां’ची घोषणा मंगळवार दिनांक १८ एप्रिल रोजी करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या सिनेसृष्टीत पुरस्काराचे मानकरी ठरलेल्यांवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दिवंगत मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८१ व्या स्मृतिदिनानिमित्त हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. गेल्या वर्षापासूनच भारतरत्न लता दीदींच्या स्मरणार्थ ‘लता दीनानाथ मंगेशकर पुस्कार’ देण्यास प्रारंभ झाला. मागीलवर्षी हा पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता. तर यंदा या पुरस्काराच्या मानकरी ‘आशा भोसले’ ठरल्या आहेत. आशा भोसले आपल्या सुरेल आवाजाने भारतातीलच नाही तर संपूर्ण जगभरातील रसिक प्रेक्षकांना त्यांच्या गोड आवाजाने मंत्रमुग्ध केले आहे.
मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कारचे मानकरी खालीलप्रमाणे आहेत.
विशेष वैयक्तिक पुरस्कार- पंकज उदास (भारतीय संगीत),
सर्वोत्कृष्ट नाटक- प्रशांत दामले फॅन फाऊंडेशनचे गौरी थिएटर्सचे ‘नियम व अटी लागू’
श्री सदगुरु सेवा संघ ट्रस्ट- (समाजसेवेच्या क्षेत्रात समर्पित सेवा)
वागविलासिनी पुरस्कार – ग्रंथाली प्रकाशन – (साहित्य क्षेत्रात समर्पित सेवा)
विशेष पुरस्कार – श्री.प्रसाद ओक (चित्रपट आणि नाटक क्षेत्रात समर्पित सेवा)
विशेष पुरस्कार- विद्या बालन (चित्रपट क्षेत्रात समर्पित सेवा)
हा पुरस्कार सोहळा २४ एप्रिल रोजी सायनच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडणार असून यावेळी कथ्थक नृत्य. राहुल देशपांडे यांचं गायन आणि हरिहरन यांचे लाईव्ह परफॉर्मंस पाहायला मिळणार आहे.