सध्या सिनेसृष्टीवर आणि प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सिनेमा म्हणजे ‘महाराष्ट्र शाहीर’. मालिका, सिनेमा, नाटक आणि रिऍलिटी शोमधून नेहमी वेगवेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार अभिनेता अंकुश चौधरी या सिनेमात देखील ‘शाहीर साबळे’ या प्रमुख भूमिकेत दिसला.
पन्नाशीच्या वयातही त्याची सध्याची कामगिरी पाहता सर्वचजण त्याचे कौतुक करीत आहे. केदार शिंदे दिग्दर्शित महाराष्ट्र शाहीरमध्ये अंकुशने शाहीर साबळे यांनी भूमिका साकारली. सिनेसृष्टीतील आतापर्यंतच्या त्याच्या कारकीर्दीत त्याने केलेला हा पहिला बायोपिक. या आधी त्याच्या अनेक भूमिकांनी प्रेक्षकांना वेड लावले तसेच या भूमिकेने ही.
पण ही भूमिका अंकुशला कशी मिळाली, हा प्रश्न अनेकांना पडला होता. कारण कोणताही बायोपिक असो त्या सिनेमासाठी प्रमुख अभिनेत्याचा आवाज किंवा कमीत कमी चेहरा पट्टी तरी जुळती असावी लागते. परंतू अंकुशच्या बाबतीत तसे काहीही नव्हते. त्यामुळे स्वतः अंकुशने त्याच्या भूमिकेबद्दलचा खुलासा केला आहे.
View this post on Instagram
अंकुश म्हणाला की, “केदार हा चित्रपट करत आहे हे मलाही माहीत होतं पण त्यात मी असेल असं मला वाटलं नाही. जेव्हा मला केदारचा कॉल आला तेव्हा मलाच आश्चर्य वाटलं. मी शाहीर साबळेंसारखा दिसत नाही हे मलाही वाटलं. ही भूमिका मी कशी करणार याचं मलाही टेंशन आलं होतं. पण ही भूमिका करायला तयार झालो कारण एक गोष्ट केदार ने मला दाखवली.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “मी ऐकत नाही म्हंटल्यावर केदारने मला त्यांच्या घरी घेऊन गेला. त्याने शाहीर साबळे यांचे जुने फोटो मला दाखवले. त्यावेळी केदारने त्यांच्यातील आणि माझ्यातील अनेक सारख्या गोष्टी निदर्शनास आणून दिल्या. त्यावेळी मला पटलं आपण ही भूमिका करू शकतो.”
शेवटी अंकुशने शाहीर साबळे यांची साकारलेली भूमिका पाहून सर्वांचेच डोळे पाणावले आहेत. सर्वचजण सिनेमा पाहून त्याच्या कामावर शुभेच्छांचा आणि कौतुकाचा वर्षाव करीत आहेत.