क्रिकेट विश्वातील सध्याचा आघाडीचा क्रिकेटपटू महेंद्र सिंग धोनी कायमच चर्चेत असतो. काही दिवसांपासून धोनीच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली होती. परंतू त्याने नुकतीच एक मुलाखत दिली तेव्हा हे स्पष्ट झाले की धोनी यंदा तरी निवृत्त होणार नाही. त्यामुळे त्याचे चाहते प्रचंड खूश आहेत.
त्याचे चाहते जेवढे त्याच्या खेळीमुळे खूश असतात त्याचप्रमाणे धोनीचा स्वभाव, त्याची प्रतिक्रिया आणि तो इतरांना देत असलेला आदर व सन्मान यामुळे देखील चाहते त्याच्यावर प्रचंड प्रेम करतात. धोनीच्या नेतृत्वाखाली यंदा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने उत्तन कामगिरी केली आहे.
आत्ताच झालेल्या एका सामन्याच्या दिवशी धोनीने ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंट्रीमधील लोकप्रिय कलाकार बोम्मन आणि बेल्ली यांची भेट घेतली. यावेळी फिल्म निर्माता कार्तिकी गोंसाल्विस सुद्धा होते. यावेळी धोनीने बोम्मन आणि बेल्ली यांना सीएसकेची 7 क्रमांकाची जर्सी भेट दिली आहे. त्यामुळे कलाकारांच्या चेहऱ्यावर खूपच सुंदर स्मिहास्य आले.
हे देखील वाचा : संतापजनक पोस्टमुळे केतकी पुन्हा एकदा चर्चेत
द एलिफंट व्हिस्परर्स डॉक्युमेंट्रीमधील कलाकारांचा सन्मान केला. तेव्हा धोनीसोबत त्याची मुलगी जीवाही होती. या डॉक्युमेंट्रीला ऑस्कर अवॉर्ड २०२३ ला मिळाला आहे. या डॉक्युमेंट्रीमधील कलाकारांची भूमिका सर्वत्र प्रचंड गाजली आहे.
१३ मार्च २०२३ हा दिवस भारतासाठी अभिमानाचा दिवस होता. कारण या दिवशी ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या भारतीय डॉक्युमेंट्रीला शॉर्ट फिल्म कॅटेगरीत हा मनाचा पुरस्कार मिळाला होता. या सुंदर क्षणांचे काही खास फोटोज् आणि व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
या पोस्टवर अनेकजण लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करीत आहेत.