५ मे रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट ‘द केरला स्टोरी’ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच चर्चेत आहे. या सिनेमा बद्दलच्या अनेक वेगवेगळ्या प्रतिक्रिया प्रेक्षकांनकडून पाहायला मिळत आहेत. हा चित्रपट केरलाच्या मुलींवर आधारित असून ही एक सत्य घटना आहे, असे बोलले जाते. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुदीप्तो सेन यांनी केले आहे. अनेक राजकीय पक्ष व धार्मिक संघटनांनी या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी केली होती. परंतु या चित्रपटाला प्रक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.
अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्जीने या सिनेमाबद्दल तिचे मत व्यक्त केले आहे. तिने काही महीन्यांनपूर्वीच तिचा बॉयफ्रेंड शाहनवाज शेखसोबत लग्न केले. तो देखील मुस्लीम आहे. तिच्या लग्नाच्या वेळी अनेकांनी तिला सोशल मिडीयावर ट्रोल केल. पण तिने अनेकदा तीच प्रेम व्यक्त करून ट्रोलर्सची तोंड बंद केली होती. तिचा पती मुस्लीम आहे असे सांगत तिने या चित्रपटावर प्रतिक्रिया दिली आहे.
नुकतीच ती तिच्या पती सोबत ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट पाहून आली व तिच्या पतीला देखील हा चित्रपट खूप आवडला. जरी तो मुस्लीम असला तरी सुद्धा त्याने या चित्रपटाविरुद्ध राग व्यक्त केलेलं नाही. तिने एका मुलीचा ‘द केरला स्टोरी’ पाहून आल्यावर तिच्या बॉयफ्रेंडचा वाईट अनुभव आलेला ट्वीट शेअर करत असे सांगितले कि, “नेहमीच असं नसतं. माझा नवरा मुस्लिम आहे. तो माझ्याबरोबर हा चित्रपट पाहायला आला होता आणि त्याला हा चित्रपट आवडला. तो हा चित्रपट पाहून नाराज झाला नाही किंवा हा चित्रपट धर्माच्या विरुद्ध आहे असं त्याला वाटलं नाही. प्रत्येक भारतीयाने असं असलं पाहिजे असं मला वाटतं.”
तिने केलेल्या ट्वीटची आत्ता सोशल मिडीयावर चांगलीच चर्चा होत आहे. काहींनी तिने केलेल्या या ट्वीट बद्दल तीच कौतुक केल तर काहींनी यावरून तिला ट्रोल देखील केल आहे.
हे देखील वाचा : Priyanka Chopra stuns in yellow saree at cousin Parineeti’s engagement party