काही दिवसांपासून बॉलिवूडमधली सुप्रसिध्द अभिनेत्री सारा अली खान आणि अभिनेता विकी कौशल या दोघांची जोडी प्रचंड चर्चेत आहे. परंतू कोणत्याही खासगी गोष्टीमुळे नाही तर या दोघांच्या आगामी सिनेमामुळे. सारा आणि विकी यांच्या आगामी सिनेमाचे नाव ‘जरा हटके जरा बचके’ असे आहे.
मागील आठवड्यात या सिनेमाचे २ पोस्टर प्रदर्शित झाले आहेत. त्यावरून त्यांच्या नव्या सिनेमाची बातमी प्रेक्षकांना समजली. जरा हटके जरा बचके सिनेमाच्या निमित्ताने सारा आणि विकी यांची जोडी पहिल्यांदाच रुपेरी पडद्यावर दिसणार आहे. तसे त्या दोघांचा एकत्र हा पहिलाच सिनेमा. या सिनेमाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून दिनेश विजन आणि ज्योती देशपांडे यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे.
तर आता या सिनेमाची आणखी एक नवीन अपडेट समोर आली आहे. सारा आणि विकी यांच्या जरा हटके जरा बचके सिनेमाचा १५ मे रोजी ट्रेलर लाँच झाला. यानुसार सिनेमाची कथा ही इंदूरमधील मध्यमवर्गीय जोडप्यावर आधारित आहे. ते दोघे कॉलेजपासून एकमेकांच्या प्रेमात होते नंतर त्यांनी लग्न केले आणि जेव्हा त्यांच्यातील वाद वाढले तेव्हा त्यांनी घटस्फोटाचा थाट घातला आहे. या सिनेमात विकी कपिल आणि सारा सौम्याची भूमिका साकारताना दिसणार आहे. ट्रेलरप्रमाणे कपिल आणि सौम्या एकीकडे एकांतात प्रेम करताना दिसतात आणि दुसरीकडे कुटुंबासमोर मात्र भांडताना दिसत आहेत.
View this post on Instagram
सारा आणि विकी या दोघांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून पोस्टर शेअर केले. पोस्टरला कॅप्शन देत लिहिले की, “जरा हटके जरा बचके… आ रहे है हम लेकर अपनी कहानी!” तसेच दुसऱ्या पोस्टमध्ये लिहिले की, रोमँटिक? की ड्रामॅटिक? क्या लगता है आपको, कैसी होने वाली है हमारी कहानी?” त्यांच्या या पोस्टवर चाहत्यांनी भरभरून लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत या सिनेमाबद्दलची उत्सुकता दाखवली आहे.
जरा हटके जरा बचके या सिनेमात सारा आणि विकीसह राकेश बेदी, शारिब हाश्मी, नीरज सूद यांसारखे अनेक दिग्गज कलाकार देखील झळकले आहेत. कपिल आणि सौम्या यांचा सहपरिवार घटस्फोट होणार की नाही अन् काय असेल या कहाणीतील पुढील ट्विस्ट हे येत्या २ जून रोजी समजणार आहे. शाहरुखच्या जवान सिनेमाची तारीख पुढे ढकलण्यात आल्यामुळे सारा आणि विकीचा जरा हटके जरा बचके २ जूनला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.