‘द केरळ स्टोरी’ सिनेमा रिलीज होण्याच्या आधीपासूनच चर्चेत होता. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात अडकला. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांना आवडेल की नाही, बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. परंतु प्रेक्षकांनी या सिनेमाला चांगलाच प्रतिसाद दिला. कदाचित वादात अडकल्यामुळे हा सिनेमा चांगलाच गाजत आहे असं म्हणायला हरकत नाही.
रिलीजच्या पहिल्या दिवसापासून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने आपली चांगलीच जादू केली आहे. चित्रपट रिलीज झाल्यापसून प्रेक्षकांना देखील प्रचंड आवडत आहे. चित्रपट रिलीज होऊन अवघे १० दिवस झाले आहेत आणि या १० दिवसांत चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. सिनेमाने १०० कोटींचा टप्पा पार केला आहे.
सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह-जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे कसे धर्मांतर करण्यात आले. या कथेवर हा संपूर्ण चित्रपट आधारलेला आहे, असा दावा चित्रपटाच्या निर्मात्यांनी केला होता. यामुळेच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. चित्रपटाने १० दिवसात १३५ कोटीची कमाई केली आहे.
हे देखील वाचा : ‘आदिपुरुष’ च्या सेटवर देवदत्त नागेला मिळाली अशी वागणूक….
शाहरुख खानचा ‘पठाण’, सलमानचा ‘किसी का भाई किसी कि जान’ आणि रणबीर कपूरचा ‘तू झुठी मे मक्कार’ या तिन्ही सिनेमांना लोकप्रियतेच्या बाबतीत मागे टाकले आहे. या सिनेमाने पठाणचे रेकॉर्ड देखील मोडीत काढले आहेत. मिडिया रिपोर्टनुसार रविवारी या सिनेमाने १६.४० कोटी तर सोमवारी १० कोटींची कमाई केली. हे बघता सिनेमाने १५० कोटींचा टप्पा देखील पार केला असेल असा अंदाज आहे. आणि लवकरच २०० कोटी कमावतील हे नक्की.