मराठमोळ्या अंदाजात दिसल्या वर्षा उसगांवकर : सुरुवातीपासूनच कायमच चर्चेत असलेला हिंदी भाषेतील शो म्हणजे ‘द कपिल शर्मा शो.’ हा शो म्हणजे अल्पावधीतच प्रचंड लोकप्रियता लाभलेला शो. सोनी मराठी वाहिनीवरील या शोचे आजवरचे जवळपास सर्वच भाग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत.
या शोमध्ये स्वतः कपिल शर्मा बड्या-बड्या कलाकारांसोबत अगदी गमतीशीर संवाद साधत असतात. तसेच सिनेमाच्या प्रमोशनसाठी देखील अनेक कलाकार या शोमध्ये उपस्थित राहून या शोच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या आणखीनच जवळ येतात. तर या शोचा आगामी भागाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. परंतू यावेळी कोणत्याही सिनेमाची टीम येणार नसून काही वर्षांपूर्वीचा सिनेसृष्टीतील भला मोठा काळ गाजवणाऱ्या तीन दिग्गज अभिनेत्री उपस्थित राहणार आहे.
कपिल शर्माच्या या शोच्या पुढील भागात अभिनेत्री वर्षा उसगांवकर, मंदाकिनी आणि संगीता बिजलानी या लोकप्रिय अभिनेत्री दिसणार आहेत. या शोच्या आगामी भागाचा प्रोमो देखील नुकताच प्रदर्शित झाला आहे. या प्रोमोमधून खास लक्ष वेधून घेतले आहे ते अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या सुंदर लूकमुळे. ही मराठमोळी अभिनेत्री द कपिल शर्मा शोमध्ये एकदम पारंपारिक पद्धतीचा पेहराव करत उपस्थित होती.
View this post on Instagram
वर्षा उसगांवकर यांनी यावेळी गडद आकाशी रंगाची आणि त्यावर लाल रंगाचे काठ असलेली नक्षीदार पैठणी नेसली होती. त्यावर त्यांनी मराठमोळ्या दागिन्यांचा देखील साज केला होता. हातात मोत्याच्या आणि सोन्याच्या बांगड्या, गळ्यात पारंपारिक बोरमाळ, मंगळसूत्र आणि चोकर तर नाकात नथ असा मराठमोळा साज केला होता. त्यामुळे अगदी सहजपणे या प्रमोमधून त्यांची अनोखी छबी उमटत होती.
या दरम्यानचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी लिहिले की, “राघू मोर जोडीला, हात नगा लावू माझ्या साडीला…” त्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी या पोस्ट भरभरुन लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.