आदिपुरुष या चित्रपटातील ‘जय श्री राम’ याच गाण्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. हे गाणे रिलीज झाल्यानंतर ते खूप लोकप्रिय झाले आणि अवघ्या 24 तासांत यूट्यूबवर सर्वाधिक व्ह्यूज मिळवत या गाण्याने अनेक विक्रम मोडीत काढले.
मराठीतीलीच नाही तर बॉलीवूड मधील प्रसिद्ध संगीतकार जोडी म्हणजे अजय – अतुल यांनी संगीतबद्ध केलेले आणि मनोज मुनताशीर यांनी लिहिले आहे. या गाण्याचे बोल भगवान श्री रामच्या सामर्थ्याचे दर्शन घडवतात. गाण्याला संगीत देताना अजय अतुल यांनी अनोख्या पद्धतीने अनेक प्रयोग केले आहेत.
View this post on Instagram
या गाण्याने एक नवीन रेकॉर्ड केला आहे. अवघ्या २४ तासात या गाण्याला युटूबवर ३२ मिलियन इतके व्ह्यूज मिळाले आहेत. आणि आणखीन व्ह्यूज वाढतील असं दिसून येत आहे. लोकांनादेखील हे गाण प्रचंड आवडल आहे.
या सिनेमात प्रभास, क्रिती सॅनन आणि सैफ अली खान सारखे प्रसिद्ध कलाकार आहेत. हा सिनेमा 16 जून 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.
या सिनेमासाठी आता प्रेक्षकदेखील आणखीनच उत्साही झाले आहेत.