महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगभरातील मराठी रसिक प्रेक्षकांना खळखळून हसायला लावणारा शो म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा‘. या शोचे सध्या प्रचंड चाहते आहेत. हा शो जणू प्रेक्षकांच्या दैनंदिन जीवनातील एक महत्वाचा भाग झाला आहे.
हास्यजत्रेतील हास्य महारथींना देखील या शोमुळे प्रचंड लोकप्रियता लाभली आहे. इतकी की सूत्रसंचालक म्हणून प्राजक्ता माळी आणि कलाकार म्हणून इतर कोणत्याही कलाकाराची अदलाबदल प्रेक्षकांना मुळीच पसंत पडेना. तसेच हा शो आणि त्यातील गाजलेली पात्र यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर देखील चांगलेच व्हायरल होत असतात.
परंतू महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोच्या चाहत्यांसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. हा शो लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. अचानक समोर आलेल्या या बातमीने प्रेक्षकांनाही धक्काच बसला आहे. अनेकांनी ही अफवा आहे असे मत मांडले, परंतू या शो मधील काही कलाकारांनी ही बातमी खरी आहे यावर शिक्कामोर्तब केला.
हास्यजत्रेतील सर्वाधिक लोकप्रिय कोहली फॅमिली मधील भिवाली अवली कोहली ही भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर हिने हास्यजत्रेच्या सेटचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत लिहिले की, ” भेटूया दोन महिन्यांनी” त्यावरून हा शो निरोप नाही तर २ महिन्यांचा ब्रेक घेत असल्याचे समजत आहे.
अभिनेत्री रसिका वेगुंर्लेकर हिने देखील इंस्टाग्राम स्टोरीवर सेटवरील फोटो शेअर करत लिहिले की, मित्रांनो काळजी करू नका. शो बंद होत नाही आहे. आमची सर्व टीम एक छोटीशी सुट्टी घेतोय आणि आम्ही लवकरच परत येऊ.” तसेच फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणून ओळखला जाणारा गौरव मोरेने देखील सेल्फी व्हिडिओ शेअर करत एक सुंदर गाने लावले आहे.
सध्या या शोच्या शेवटच्या भागाचे शूटिंग चालू आहे. तर २९ मे पासून या वेळेत सचिन खेडेकर यांच्या कोण होणार करोडपतीचे नवीन पर्व पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा : आदिपुरुष या चित्रपटातील ‘जय श्री राम’ या गाण्याने केला नवीन रेकॉर्ड…