‘तनु वेड्स मनू रिटर्न्स’ या चित्रपटाला ८ वर्ष पूर्ण झाली आहेत. कंगना आणि आर. माधवन या चित्रपटात मुख्य भूमिकेत होते. प्रेक्षकांनी या चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच जादू केली होती. त्याच बरोबर अनेक कलाकारांकडून देखील चित्रपटाचे कौतुक होत होते.
या चित्रपटात आर. माधवन हा अत्यंत शांत आणि संयमी दाखवला आहे, पण तेच कंगना अगदी त्याच्या उलट चिडकी आणि अतीउत्साही आणि एकदम धडाकेबाज दाखवली आहे. दोघांची लव्हस्टोरी देखील प्रेक्षकांना चांगलीच भावली. काल या चित्रपटाला ८ वर्ष पूर्ण झाले. या चित्रपटाचा पहिला भाग देखील चांगलाच गाजला होता.
यानिमित्ताने कंगनाने तिच्या सोशल मिडिया वरून सिनेमाच्या शुटींग दरम्यानचे फोटो शेअर केले. या फोटोत कंगना सोबत चित्रपटाचे दिग्दर्शक आनंद एल राय देखील आहेत. फोटो शेअर करत कंगनाने आनंद राय यांना एक विनंती केली आहे की, “जसे TWMR ने 8 वर्षे पूर्ण केली आहे. पब्लिक डिमांडनुसार मी आनंद एल राय यांना या चित्रपटाचा तिसरा भाग बनवण्याची विनंती करते. क्या बोलते हो दोस्त.”
Kangana Ranaut asked @aanandlrai ji to make #Tanuwedsmanu3 on public demand as twmr has completed 8 years today#KanganaRanaut #KanganaRanaut𓃵 pic.twitter.com/XFJJkThJdd
— KRInstaupdate (@KR_Insta) May 22, 2023
चाहते देखील चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मागे एका मुलाखती दरम्यान आर. माधवनला याबद्दल विचारले असता त्याने यावर काही सकरात्मक उत्तर दिले नाही.
हे देखील वाचा : आता थेट दक्षिण कोरियामध्ये सत्संग भरणार…
तो म्हणाला, “जर ती एव्हेंजर्स किंवा सुपरहिरो मालिका असती तर ते सोपे झाले असते, कारण तेव्हा तुमच्याकडे एक टेम्पलेट आहे, परंतु तनु वेड्स मनू या चित्रपटात ते अशक्य आहे. या चित्रपटासाठी मला जे काही करायचे होते ते मी केले आहे आणि आता मला पुन्हा मनू बनायचे नाही.”
त्याच्या या वक्तव्यामुळे चाहते नाराज झाले होते. परंतू कंगनाच्या या फोटोमुळे चाहते काहीसे खुश झाले आहेत. त्यामुळे या चित्रपटाचा तिसरा भाग येणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.