मागील अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारा छोट्या पडद्यावरील शो म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा‘. ही मालिका मागील काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आली आहे.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांच्या अडचणींमध्ये दिवसेंदिवस अधिकाधिक वाढच होत आहे. त्यामुळे या मालिकेच्या चाहत्यांमध्ये नाराजी पसरली आहे. प्रेक्षकांच्या आवडत्या कलाकारांच्या अचानक एक्झिटमुळे मालिकेच्या प्रेक्षकांमध्ये आधीपासूनच नाराजी होती.
एक्झिट झालेल्या काही कलाकारांपैकी एक लोकप्रिय कलाकार म्हणजे टप्पू ही भूमिका साकारणारा अभिनेता भव्य गांधी. याने खूपच लहान वयात अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. या मालिकेमुळे भव्य अगदी लहानपणापासूनच प्रसिद्धीच्या झोतात आला. अनेक वर्षे ही मालिका केल्यानंतर अभ्यासाच्या कारणामुळे त्याने काही वर्षांपूर्वी या मालिकेचा निरोप घेतला.
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेमुळे भव्यचे चाहते देखील प्रचंड आहेत. तो कायम सोशल मीडियावर सक्रीय असतो. मालिकेनंतर आतापर्यंत तो अनेक गुजराती सिनेमांमध्ये झळकला आहे. परंतू त्याचा कोणताच सिनेमा म्हणावी तशी उत्तम कामगिरी करू शकला नाही. परंतू आता त्याच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भव्य लवकरच एका मोठ्या सिनेमात झळकणार आहे.
भव्य गांधी हा सध्या लंडनमध्ये त्याच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग करत आहे. ‘न्यू बिगनिंग्स’ या सिनेमामध्ये भव्य गांधी दिसणार आहे. त्यामुळे त्याला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी त्याचे चाहते प्रचंड उत्सुक आहेत.