‘बिग बॉस’ या रियालिटी शो मधून घराघरात पोहचलेला सर्वांचा लाडका अब्दु रोझिक याने शो च्या माध्यमातून सर्वांची मन जिंकून घेतली होती. तो ‘बिग बॉस च्या घरात आल्यापासून त्याने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं त्याचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. सलमान खान देखील त्याच्यावर खूप खुश होता. अब्दु सलमानच्या ‘किसी का भाई किसी कि जान’ या चित्रपटात झळकणार होता. या चित्रपटाच्या माध्यमातून पाहिल्यांदाच सलमान त्याला लॉन्च करणार होता. पण काही कारणांमुळे अब्दू या चित्रपटामध्ये दिसला नाही.
अब्दू ‘किसी का भाई किसी कि जान’ या चित्रपटात दिसणार म्हणून त्याचे चाहते खुश झाले होते. मात्र याबाबत अब्दुने काही गोष्टींचा खुलासा केला आहे त्याने असं म्हंटल कि, “मी या चित्रपटात काम करणार होतो. मी या चित्रपटासाठी शूटिंगही केली होती. पण माझे सीन्स चित्रपटाच्या कथेशी एकरूप होत नव्हते. निर्माते-दिग्दर्शकांना माझ्या सीन्समध्ये बदल कारायचे होते आणि त्यासाठी मला पुन्हा शूटिंग करावं लागणार होतं. पण त्यावेळी मी बिग बॉसच्या घरात होतो आणि तिथून चित्रपटाच्या शूटिंगसाठी बाहेर पडण्याची परवानगी मिळाली नाही. म्हणून मी याचं पुन्हा शूटिंग करू शकलो नाही आणि टीमने माझे सीन्स चित्रपटातून काढून टाकले.”
अब्दू चित्रपटामध्ये न दिसल्याने त्याच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली होती. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट 16 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला असून भाईजान सोबत पूजा हेगडे या चित्रपटात मुख्य भूमिकेत होती. याच चित्रपटाच्या माध्यमातून शेहनाज गिल आणि पलक तिवारीन म्हणजेच श्वेता तिवारीच्या मुलीने बॉलिवूडमध्ये पहिलं पाहुल टाकलं.
हे देखील वाचा : टप्पू अर्थात ‘भव्य गांधी’ झळकणार या मोठ्या सिनेमात