मराठीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक म्हणजे हेमांगी कवी. हेमांगीने आतापर्यंत तिच्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ती सोशल मिडियावर नेहमीच सक्रीय असते. तिला तिच्या खाजगी आयुष्यावर बोलायचे असुदेत किवा महिलांविषयी एखादा मुद्दा असुदेत. ती तिची मते नेहमीच अगदी खुलेपणाने मांडत असते.
ती नेहमीच सोशल मिडियावर काही ना काही फोटो टाकत असते, तिच्या फोटो खालील कॅप्शन देखील वाचण्याजोगे असतात. ती चित्रपटाच्या शुटींगसाठी कुठेही जाऊदेत किंवा सुट्टीत कुठे फिरायला जाऊदेत हे सगळ ती तिच्या चाहत्यांसोबत शेअर करत असते.
आज तिने एका वेगळ्या विषयावर भाष्य केले आहे.हेमांगी कवी सध्या तिच्या गावी म्हणजेच साताऱ्याला गेली आहे. तिला गावाची प्रचंड ओढ आहे. ती ग्रामीण विषयावर देखील नेहमीच भाष्य करताना दिसून येते. मागील काही दिवसांपूर्वी ती म्हसवडच्या यात्रेतही सहभागी झाली होती. तिने तिच्या घराचा फोटो शेअर केला आहे आहे तसेच घरासोबत काढलेला सेल्फी देखील शेअर केला आहे. या फोटो मध्ये हेमांगीने गाऊन परिधान केला आहे.
तिने फोटो खाली लिहिले आहे की, “ जगात, देशाबाहेर किती ही फिरलो तरी गावची सर कुठेही नाही. शाळेत असताना उन्हाळ्याच्या सुट्टीत २ महिने मुक्काम असायचा. आता कामामुळे शक्य होत नसलं तरी २ दिवस का होईना गावाला जातेच. म्हणजे मी वरचेवर गावाला येत असते पण उन्हाळ्याच्या सुट्टीची बात ही अलग है!
जेव्हा मला कुणी सांगतं की त्यांना गावच नाही तेव्हा मला कसंसच होतं. लहानपणी प्रश्न पडायचा असं कसं? गावच नाही? पण नसतं! ठिके! मग मी त्यांना आमच्या गावाला यायचं आग्रहाचं आमंत्रण देते! काही जण येऊन- राहून गेलेत. आता त्यांनाही गाव आहे. सांगायला गावच्या आठवणी आहेत. गाव नसणं म्हणजे आई- वडील नसण्यासारखं वाटतं मला. मी खरंच भाग्यवान, ‘गाव’ नावाची संपत्ती आहे माझ्याकडे!”.
तिने गाऊन परिधान केला आहे त्यावर तिने लिहिले आहे, “कपड्यांवरून कुणाची कसलीही मापं काढू नयेत ही मंडळातल्या काही सदस्यांना नम्र विनंती.”
तिच्या या भावुक आणि भन्नाट कॅप्शनवर चाहते देखील खुश झाले आहेत. अनेक चाहत्यांनी तिच्या या पोस्टवर कमेंट देखील केल्या आहेत. त्यातील एका चाहत्याने लिहिले आहे की, “हेमांगी ताई कसलं भारी लिहलंय तू खरंच, कुठतरी जाणवून दिलीस ती गावाची ओढ…. खरंच साळस आहेस तू… बोरिवली ला जेव्हा तुला भेटलो होतो जशी तेव्हा भासलीस. आज ही ह्या गाऊन मध्ये ही तेवढीच सुरेख दिसतेस तू… ✌🏽✌🏽” , तर दुसऱ्याने लिहिले आहे, “ताई खरच तुझ हे साध राहणीमान मला खूप आवडत तू खूप रिअल आहेत.” तीच हे साधं राहणीमान पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय.