सध्या सगळीकडे OTT चं वार वाहतंय. २०२० मध्ये कोविडमुळे संपूर्ण जग ठप्प झालं आणि सगळ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला. मनोरंजन सृष्टीला देखील याचा चांगलाच फटका बसला. आणि याच दरम्यान OTT वर प्रेक्षक वाढले, कारण त्यावेळी सगळे थियेटर बंद होते.
OTT वर अनेक सिरीज सध्या चालत आहेत, त्यातीलच एक लोकप्रिय सिरीज म्हणजे असुर. २ मार्च २०२० ला असुर OTTवर रिलीज झाली. परंतु याला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यांनतर काही दिवसातच लॉकडाऊन लागले आणि याच लॉकडाऊनमध्ये प्रेक्षकांनी ‘असुर’ला अगदी डोक्यावर घेतले. तेव्हापासूनच प्रेक्षक या सिरीज च्या दुसऱ्या सिझनची अगदी आतुरतेने वाट पाहू लागले.
अखेर प्रेक्षकांची ही प्रतीक्षा संपली आहे. ‘असुर’चा दुसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच याचा फर्स्ट लुक समोर आला आहे. यात हे नाट्य आणखी एका वेगळ्या आणि भयानक वळणावर येऊन थांबलंय आणि या दुनियेत आणखी एका असुराची एन्ट्री होणार असे संकेत देण्यात आले आहेत. हा अजून एक असुर कोण आणि त्याला रोखण्यात यश मिळणार का? याचं उत्तर मात्र तुम्हाला सीरिजमध्येच मिळणार आहे.
हे देखील वाचा : ‘द केरळ स्टोरी’ची रेकॉर्ड ब्रेक कमाई….
या टिझरमध्ये अर्शद वारसी राक्षसाला पकडण्यासाठी निघालेला दिसत आहे. हाच असुर सिरीयल किलर बनून लोकांना मारतोय.या वेब सिरीजच्या दुसऱ्या भागातही तुम्हाला फॉरेन्सिक तज्ज्ञ निखिल म्हणजेच बरुण सोबती आणि सीबीआय अधिकारी धनंजय राजपूत (अर्शद वारसी) यांच्यातील मतभेद आणि असुर यांच्यातील संबंध पाहायला मिळतील. याशिवाय या सिनेमात मुख्य खलनायकाच्या भूमिकेत मराठमोळा अभिनेता अमेय वाघ झळकणार आहे.
‘असुर’चा हा दूसरा सीझन जिओ सिनेमा या ओटीटी प्लॅटफॉर्मवर १ जूनपासून मोफत बघायला मिळणार आहे. या नव्या सीझनमध्ये बरुण सोबती, अर्शद वारसी, रिद्धी डोग्रा, अनुप्रिया गोएंका, अमेय वाघ हे कलाकार पुन्हा एकदा प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. प्रेक्षकांना हा फर्स्ट लूक आवडला असून ते याच्या सीझन २ ची आतुरतेने वाट बघत आहेत.