काही सिनेमे आपण कधीच विसरू शकत नाही. ते नेहमीच आपल्या लक्षात राहतात. त्यातीलच एक सिनेमा म्हणजे ‘गदर : एक प्रेम कथा’ हा सिनेमा प्रदर्शित होऊन २२ वर्ष झाली आहेत. तरीही आजही हा सिनेमा प्रेक्षकांच्या तितकाच लक्षात आहे. यांची प्रेमकथा चांगलीच गाजली होती. आजही प्रेक्षक तारासिंग आणि सकीनाला विसरू शकले नाहीत.
काही दिवसांपूर्वी ‘गदर २’ ची घोषणा झाली होती. या चित्रपटाचे शुटींग देखील पूर्ण झाले, त्यामुळे प्रेक्षक प्रचंड खुश आहेत. काही महिन्यांपूर्वी या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. पण त्यापूर्वी ‘गदर एक प्रेमकथा’ चित्रपटालाही चित्रपटगृहात पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येणार आहे. अभिनेता सनी देओलने पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.
View this post on Instagram
२३ वर्षांनंतर ‘गदर’ पुन्हा एकदा सिक्वेलसह प्रदर्शित होत आहे. याबाबत सनी देओलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. सनीने लिहिले, “तेच प्रेम, तीच कथा, पण यावेळेस अनुभव वेगळा असेल. ९ जून रोजी ‘गदर एक प्रेम कथा’ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित करण्यात येणार आहे. तब्बल २२ वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे. तर ‘गदर २’ ११ ऑगस्टला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होईल. चित्रपटाचे दिग्दर्शक अनिल शर्मा यांनी गेल्या वर्षीच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची घोषणा केली होती.
आता गदर पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहता येणार त्यामुळे प्रेक्षक खुश झाले आहेत.