सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे बॉलिवूड स्टार सलमान खान व विकी कौशल यांच्या एका व्हिडीओची. आयफा फिल्म पुरस्कार सोहळ्यासाठी काही बॉलिवूड कलाकार एकत्र आले होते. हा सोहळा आबु धाबिमध्ये आयोजित करण्यात आले होते.
सलमान खान, अभिषेक बच्चन, फराह खान तसेच विकी कौशल या कलाकारांनी आयफा पुरस्कारासाठी हजेरी लावली होती. सलमान त्याच्या नव्या लूक मध्ये दिसत आहे.
IIFA 2023 च्या सोहळ्यात सलमान खानने विकी कौशलकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे बोलले जात आहे. त्याच्या सुरक्षा रक्षकांनी देखील विकिला धक्काबुक्की केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून ज्यावेळी सलमान त्याच्या बॉडीगार्डसह सोहळ्यात प्रवेश करतो तेव्हा विकी त्याच्या पासून काही अंतरावरच उभा असतो, तो त्याला हात मिळवण्याचा देखील प्रयत्न करतो पण सलमान त्याच्याकडे दुर्लक्ष करून तिथून निघून जातो.
What an insult of #VickyKaushal 😄🙈👀. #SalmanKhan & his bodyguards totally ignored & Kicked him out at the #IIFA2023 Redcarpet. 😝 pic.twitter.com/au07LjbXoc
— Umair Sandhu (@UmairSandu) May 26, 2023
सलमानचे चाहते नेहमीच त्याच तोंडभरून कौतुक करत असतात. या व्हायरल व्हिडीओवर देखील त्याच्या चाहत्यांनी एक कमेंट केली आहे. ‘वाघ आला की रस्ता मोकळा करावाच लागतो, मग तो कोणीही असो’ असे ते म्हणाले आहेत. पण या सगळ्यावर विकी कौशालची प्रतिक्रिया मात्र काही वेगळीच आहे. तो म्हणतो की, ‘कधी कधी गोष्टी अशाच वाढत जातात.’
आणखी हे वाचा : Salman Khan’s Bodyguard Pushes Vicky Kaushal at IIFA 2023″
याविषयी त्याने अजून काही गोष्टींचा खुलासा केला आहे. विकी कौशलने आयफा रॉक्स सेरेमनीच्या ग्रीन कार्पेटवर वृत्तसंस्था पीटीआयला सांगितले की, ‘अनेकदा अनेक गोष्टी उगाच वाढवल्या जातात. सध्या उगाचच्या चर्चा होत आहेत. तसेच जसं व्हिडिओमध्ये दिसतं तशाच गोष्टी असतात असं नाही. त्यावर बोलण्यात काही अर्थ नाही.’
He is the most caring and loving person so the hate against him is none of use – @BeingSalmanKhan GEM OF A PERSON #SalmanKhan #VickyKaushal pic.twitter.com/z2INE4FQwq
— Salmans Soldier (@SalmansSoldier) May 26, 2023
काही वेळा नंतर सलमान खान स्वतः विकी कौशल कडे जाऊन त्याला मिठी मारली व सर्व्या अफवांवर पूर्णविराम दिला.