बॉलिवूड अभिनेत्री जितक्या त्यांच्या सिनेमांमुळे चर्चेत असतात, तितक्याच त्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रचंड चर्चेत असतात. आपल्यापेक्षा लहान वयाच्या मुलासोबत लग्न करणे, किंवा लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणे, लग्नाआधीच मुल होणे हे सगळं अगदी उघडपणे अभिनेत्री करतात. चाळीशीनंतर आपल्या शरीरात अनेक बदल होत असतात, खासकरून एखाद्या स्त्रीच्या शरीरात. पण तरीही अगदी खंबीरपणे स्त्रिया काम करत असतात.
बॉलिवूडमध्ये एका वयानंतर काम मिळायचं बंद होत, असं ऐकण्यात आलं आहे. आणि असचं काहीस बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत घडत आहे. ही अभिनेत्री म्हणजे दिग्दर्शक अनुराग कश्यपची एक्स बायको कल्की कोचलीन. कल्की तिच्या उत्तम अभिनयामुळे तर नेहमी चर्चेत राहिलीच, पण सगळ्यात जास्त चर्चेत राहिली ती म्हणजे अनुराग कश्यपसोबत तीच झालेलं लग्न. पण या दोघांच नात फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या दुसऱ्या वर्षीच या दोघांनी घटस्पोट घेतला. त्यांनतर अनेक वर्ष कल्की एकटी होती. पण गेल्या अनेक वर्षांपासून कल्की तिचा बॉयफ्रेंड ‘गाय हर्शबर्ग’सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहे. या दोघांनी २०२० मध्ये एका गोंडस मुलीला जन्म दिला.
या सगळ्यामुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. पण आता पुन्हा एकदा ती चर्चेचा विषय बनली आहे. नुकतच एका मुलाखतीमध्ये तिने चाळीशीनंतर महिलांना बॉलिवूडमध्ये काम मिळत नाही याबद्दल तिने भाष्य केले. यावेळी बोलताना ती म्हणाली, “आजकाल लोक खूप कठोर झाले आहेत. विशेषतः जेव्हा तुम्ही ४० वर्षांचे असाल. तुमच्या शरीरात काय बदल होत आहेत हे त्या लोकांना अजिबात माहीत नसते. त्यांना मोनोपॉजबद्दल माहितीही नसते. हे देखील कारण आहे की आपण याबद्दल जास्त लिहित नाही.”
पुढे ती म्हणाली, “मी पूर्वीपेक्षा प्रोजेक्टबद्दल जास्त निवडक झाली आहे. कारण मला माझ्या मुलीपासून लांब जायचे नाही. तेही माझ्या हातात चांगला प्रोजेक्ट असल्याशिवाय नाही. हे देखील खरे आहे की अनेक प्लॅटफॉर्म आहेत पण चांगले प्रोजेक्ट फार कमी आहेत आणि कामही खूप कमी आहे. असं नाही ऑफर्स येत नाहीत ,पण स्क्रिप्ट पण चांगली असायला हवी. चांगला प्रोजेक्ट मिळाला तर मला काम करायला नक्की आवडेल.”
सध्या कल्कीचं हे विधान चांगलच व्हायरल होत आहे. कल्कीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने आता पर्यंत ‘ये जवानी है दिवाणी’, ‘जिंदगी ना मिलेगी दोबारा’ यांसारख्या अनेक हिट सिनेमांमध्ये काम केले आहे. कल्कीला तिच्या ‘मार्गरीटा विथ अ स्ट्रो’ या सिनेमासाठी ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ देखील मिळाला आहे.