सध्या सोशल मीडिया वर चर्चा आहेत त्या अमृता खानविलकर हिच्या ‘लुटेरे’ या वेब सीरिजच्या! अमृता नेहमीच चर्चेत असलेली अभिनेत्री तर आहेच हे तिने कायम सिद्ध केलं आहे. कायम आव्हानात्मक भूमिका साकारून तिने बॉलिवुड मध्ये देखील आपल स्थान अढळ केलं आहे. ‘लुटेरे’ सारख्या दर्जेदार वेब सीरिज मधून तिने ‘अविका’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांना मोहित केलं आहे. आता तिच्या अभिनयाची भुरळ चक्क कॉमेडियन-अभिनेता झाकीर खान याला देखील पडली आहे. झाकीरने नुकताच तिचा वेब शो बघून सोशल मीडिया वरून तिच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.
झाकीर खानने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करून म्हटलं, “‘लुटेरे‘ सारखा शो बघण उत्कंठावर्धक आहे आणि आता शिप मध्ये सोडा जहाजात बसण्याआधी होडीत बसण्यासाठी सुद्धा १० वेळा विचार करेन! माझी आवडती ‘अमृता खानविलकर’ हिने शो मध्ये कमाल केली.”
View this post on Instagram
लुटेरेसाठी अमृताला अनेक कमालीच्या प्रतिक्रिया मिळत असताना आज झाकीरने तिचं कौतुक करणं देखील तितकच खास आहे. लुटेरेमधून अमृताने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. आता पुढे अमृता काय करणार? याकडे सर्वांच लक्ष आहे.
येणाऱ्या काळात अमृता अनेक बड्या प्रोजेक्ट्स मध्ये दिसणार यात शंका नाही.