सोशल मीडिया हे जसं उपयोगाच आहे. तसचं ते खूप धोकादायक सुद्धा आहे. आपण आपल्या आयुष्यातील बऱ्याच गोष्टी सध्या सोशल मीडियावर टाकत असतो. आज काल सोशल मीडियामुळे ट्रोलिंगचे प्रमाण देखील वाढले आहे. त्यात कलाकार मंडळींना रोजच या सगळ्याचा सामना करावा लागतो. काही कलाकार नेहमीच ट्रोलिंगवर बोलणं टाळतात, मात्र काही कलाकार असे देखील असतात जे ट्रोलरला सडेतोड उत्तर देतात.
‘सा रे गा मा पा लिटील चॅम्प्स’ या शो ने आतापर्यंत अनेक गायकांना लोकप्रियता मिळवून दिली. काही गायक सिनेसृष्टीत आपलं नाव चांगलच गाजवत आहेत. त्यापैकीचं एक जोडी म्हणजे मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे. मुग्धा आणि प्रथमेश हे दोघेही ‘सा रे गा मा पा लिटील चॅम्प्स’ या शोमुळे महाराष्ट्राच्या घराघरात पोहचले. त्यांच्या आवाजाचे आज लाखो करोडो चाहते आहेत. मागील काही महिन्यांपूर्वी म्हणजेच २१ डिसेंबर २०२३ रोजी हे दोघे लग्नबंधनात अडकले. अगदी साध्या आणि पारंपारिक पद्धतीने दोघांचे लग्न झाले. प्रथमेश आणि मुग्धा यांनी कधीच नात लपवलं नव्हत. ते दोघेही सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. लग्नानंतर दोघेही चांगलेच चर्चेत आले आहेत.
नुकतच दोघांच्या लग्नाला ३ महिने पूर्ण झाले. या निमित्ताने दोघेही गोव्याला देवदर्शानासाठी गेले होते. याचे फोटो दोघांनी सोशल मीडियावर शेअर केले. यावेळी मुग्धाने सुंदर अशी निळ्या रंगाची साडी नेसली होती, आणि प्रथमेशने पोपटी रंगाचा कुर्ता घातला होता. याचा फोटो शेअर करत मुग्धाने खाली लिहिले की, “कालच आमच्या लग्नाला ३ महिने पूर्ण झाले! याच निमित्ताने आज गोव्यातल्या केरीला जाऊन विजयादुर्गा देवीचं आणि माणगावातील श्री दत्त मंदिरात जाऊन दत्त महराजांचं, श्रीमद् परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महराजांचं दर्शन घेतलं.”
त्यांच्या फोटो खाली अनेकांनी त्याचं कौतुक करत कमेंट केल्या आहेत. पण कौतुकासोबतच अनेकांनी मुग्धाला ट्रोल केल आहे. या सगळ्यांना मात्र मुग्धा आणि प्रथमेश या दोघांनी सडेतोड उत्तरं दिली. एकीने म्हंटल आहे, “काकू झाली आहे टिपिकल बाई” या कमेंट ला रिप्लाय करत मुग्धा म्हणाली, “स्तुती केल्याबद्दल धन्यवाद आजी”. तर प्रथमेशने देखील, “आमच्या कोकणात एक म्हण आहे. ‘माकड म्हणत आपलीच लाल’ जस्ट सांगितलं…बाकी मनात काही नाही आजी”. तर एकाने कमेंट केली की, “काय म्हणताय काकू” याला रिप्लाय देत मुग्धा म्हणाली, “मी एकदम मस्त अण्णा आजोबा”.
अशा पद्धतीने ट्रोल करणाऱ्यांना मुग्धा आणि प्रथमेश यांनी सडेतोड उत्तरे दिली आहेत.