धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर सिनेमाला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर उचलून धरलं होतं. थिएटरनंतर ओटीटी प्लॅटफॉर्मवरही हा सिनेमा प्रेक्षकांनी तितक्याच आवडीनं पाहिला. आता या सिनेमाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘धर्मवीर’च्या अभूतपूर्व यशानंतर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची गाथा उलगडणारा आणि साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट उलगडून सांगणारा मंगेश देसाई निर्मित आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर २’ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या सिनेमाच्या मुहूर्तानंतर आता सिनेमाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला असून सिमेमाबद्दल मोठी अपडेट मंगेश देसाई यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून तमाम प्रेक्षकांना दिली आहे.
आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित ‘धर्मवीर: मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमानं प्रेक्षकांची मनं जिंकली. धर्मवीर आनंद दिघे यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या घटना सिनेमातून दाखवण्यात आल्या. ‘धर्मवीर : मुक्काम पोस्ट ठाणे’च्या भरगोस यशानंतर धर्मवीर २ च्या शूटिंगला प्रारंभ झाला आहे. ‘धर्मवीर २’ च्या शूटिंगला सुरूवात झाल्यानंतर आता पुढच्या भागात नेमकं काय दाखवणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. सिनेमा कधी रिलीज होणार याची प्रेक्षक अगदी उत्सुकतेने वाट पाहत आहेत.
View this post on Instagram
अभिनेता प्रसाद ओक आणि क्षितिश दाते यांच्या शिवाय धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमात श्रृती मराठे, स्नेहल तरडे, गश्मिर महाजनी, प्रसाद खांडेकर, अभिजीत खांडकेकर, दुष्यंत वाघ, सुशांत शेलार सारखे अनेक कलाकार प्रमुख भूमिकेत होते.
धर्मवीर २ मधला शेवटचा सीन सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. शेवटच्या सीनमध्ये आनंद दिघे यांच्या निधनानंतर त्यांची जवळची माणसं, कार्यकर्ते यांच्या अश्रृंचा बांध फुटल्याचं दाखवण्यात आलं होतं. तसेच सिनेमाच्या पहिल्या भागात आनंद दिघेंचा मृत्यु पाहायला मिळाला होता. मग दुसऱ्या भागात नेमकं काय पाहायला मिळणार? याकडं आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
हे देखील वाचा : प्रेक्षकांसाठी बॉबी देओल हाच ‘अॅनिमल’चा खरा स्टार
धर्मवीर २ सिनेमाचे निर्माते मंगेश देसाई यांनी अभिनेते प्रसाद ओक यांचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त मंगेश देसाई यांच्या सोशल मीडिया पोस्टची चर्चा रंगली आहे. ‘असा हा ”धर्मवीर”…. तीच करारी नजर आणि तोच करारी बाणा…’ असं मंगेश देसाई यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं आहे. तसेच त्यांनी पुढे लिहिले की, “‘धर्मवीर’च्या अभूतपूर्व यशानंतर गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या संघर्षमय जीवनप्रवासाची गाथा उलगडणारा आणि ” साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट” उलगडून सांगणारा मंगेश देसाई निर्मित आणि प्रवीण तरडे दिग्दर्शित ”धर्मवीर – २ साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट” या चित्रपटाच्या मुहूर्तानंतर आज चित्रपटाच्या चित्रीकरणाचा श्रीगणेशा झाला आहे. लवकरच अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशभराला धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट मराठी आणि हिंदी दोन्ही भाषेत रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यामुळे सज्ज व्हा, धर्मवीर पुन्हा येतायत आपल्या भेटीला…!!”
त्यांच्या या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. तसेच या सिनेमाबद्दल मंगेश देसाई सोशल मिडीयाच्या माध्यमातून अजून एक महत्वाची बातमी प्रेक्षकांपर्यंत पोहचवली आहे. ‘धर्मवीर २’ हा सिनेमा मराठीच नाही तर हिंदीतही येणार असल्याची माहिती त्यांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून दिली आहे.