मराठी सिनेसृष्टीत अशी अनेक जोडपी आहेत. ज्यांनी आतापर्यंत कधीच एकत्र काम केले नाही. त्यातीलच एक जोडी म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सुकन्या मोने आणि अभिनेता संजय मोने. सुकन्या आणि संजय हे दोघेही मराठी सिनेसृष्टीतील उत्तम आणि प्रसिद्ध कलाकार आहेत, तसेच ही जोडी अतिशय लोकप्रिय देखील आहे. गेले अनेक वर्ष दोघेही आपल्या उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. या दोघांनीही आतापर्यंत अनेक सिनेमे, नाटकं, मालिका केल्या आहेत. पण सगळ्यात आश्चर्याची बाब म्हणजे या दोघांनी गेले २० – २२ वर्षात एकत्र काम केले नाही. आणि या मागचं कारण नुकतच एका मुलाखती दरम्यान स्वतः संजय मोने यांनी सांगितले.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, “लग्नानंतर आपल्या मुलीला जास्त वेळ देता यावा, म्हणून आम्ही दोघांनी ही ठरवलं होत. पुढचे २० – २२ वर्ष एकत्र काम करायचं नाही. कारण दोघेही एकत्र बाहेर गेलो तर मुलीकडे कोण लक्ष देणार? मुलांच्या वाढत्या वयात त्यांना सर्वात जास्त त्यांच्या आई वडिलांची गरज असते. मुलीला १६ १७ वर्षाची होईपर्यंत आपली गरज असते. त्यांनतर त्यांना गरज नसते. म्हणून आम्ही कधीही एकत्र काम करत नाही.”
दरम्यान लग्नानंतर सुकन्या यांचा मोठा अपघात झाला होता. त्यामुळे डॉक्टरांनी सुकन्या यांना मुल न होऊ देण्याचा सल्ला दिला होता. मात्र सुकन्या यांना स्वतःचं एक मुल हवच होत. आणि त्या हट्टाला पेटल्या होत्या. मात्र संजय आणि सुकन्याच्या सासूबाईंचा त्यांच्या या निर्णयाला विरोध होता. पण कोणाच ही न ऐकता सुकन्या यांनी त्यांच्या मुलीला जन्म दिला. सुकन्या आणि संजय यांनी त्यांच्या मुलीचं नाव ज्युलिया असं ठेवल आहे. तिच्या नावामागचं कारण देखील तितकच खास आहे.
एका मुलाखती दरम्यान सुकन्या यांनी त्यांच्या मुलीचं ज्युलिया हे नाव का ठेवलं याच कारण सांगितल होत. ज्युलिया जेव्हा पोटात होती. तेव्हा सुकन्या या नेहमी संजय यांना तिच्याशी बोलायला सांगायच्या, मात्र संजय यांना ते काही पटायचं नाही. पण जेव्हा ज्युलियाचा जन्म झाला तेव्हा संजय यांनी तिला आवाज दिला तेव्हा ती त्यांच्या कडे बघून हसली. तेव्हा संजय म्हणाले, “ही काय हसते यार, ज्युलिया रॉबर्टसची आठवण आली”. म्हणून त्यांनी तीच नाव ज्युलिया ठेवलं.
ज्युलिया ही वन्यप्राणी जीवनशास्त्र या विषयात शिक्षण घेत आहे. दरम्यान ज्युलिया ही बाई पण भारी देवा या सिनेमात देखील झळकली होती. या सिनेमात तिने सुकन्या यांच्या तरुणपणीची भूमिका साकारली होती.