शेखर बापू रणखांबे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रेखा’ या लघुपटाला १५ व्या बर्लिन आर्ट फिल्म फेस्टिवलमध्ये ‘सर्वोत्तम इंडी फिल्म’ आणि ‘सर्वोत्तम दिग्दर्शक’ हा पुरस्कार मिळाला आहे. या चित्रपटातील ‘रेखा’ ही भूमिका तासगाव मधील एका भटक्या समाजातील माया पवार या महिलेने साकारली आहे. रस्त्यावर काम करणाऱ्या, कचरा गोळा करणाऱ्या, वस्तू विकणाऱ्या महिलांची शारीरिक आणि मानसिक स्वच्छता याबाबत ही फिल्म बनवण्यात आली आहे. चित्रपट निर्माते रवी जाधव, फिल्म प्रस्तुत मेघना जाधव आणि शेखर बापू यांनी निर्मित केलेल्या या चित्रपटाला ‘सर्वोत्कृष्ट फिल्म’ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ आणि ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ असे तीन पुरस्कार मिळाले.
हा लघुपट तासगाव, सांगली बस स्थानक, या परिसरात चित्रित करण्यात आल आहे. या परिसरातील कलाकारांनी लघुपटात सहभाग घेतला आहे. रणखांबे यांच्या ‘पामप्लेट’, ‘धोंडा’ या लघुपटांनाही अनेक पुरस्कार मिळाले आहेत.
दिग्दर्शक शेखर रानखांबे यांच्या कथेला प्रसिद्ध चित्रपट आणि नाट्य निर्माते रवी जाधव यांनी हिरवा कंदील दाखविला आणि ‘रेखा’ची निर्मिती झाली. आत्ता या फिल्मला बर्लिन येथे १७ व्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट ‘इंडी फिल्म’ व ‘सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक’ ही दोन पुरस्कार मिळाल्याने कलाकारांचा डंका घराघरात वाजला जातो.
‘रेखा’चे निर्माते रवी जाधव यांनी हा लघुपट बर्लिन येथे १७ व्या चित्रपट महोत्सवासाठी पाठविला होता. त्याला सर्वोत्कृष्ट भारतीय लघुपट आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाल्याचे बर्लिन चित्रपट महोत्सवाच्या संयोजकांनी कळविले, असे ‘रेखा’चे दिग्दर्शक शेखर रणखांबे यांनी सांगितले.