सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाच्या पहिल्या सिझनमधील महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेले मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लगाटे सोशल मिडीयावर नेहमी चर्चेत असतात. मुग्धा तिचे आणि प्रथमेशचे फोटो आपल्या सोशल मिडीयावर नेहमी शेअर करत असते. त्या दोघांच्या फोटोवर चाहत्यांचा नेहमीच प्रेमाचा वर्षाव सुरु असतो. आता पुन्हा एकदा एका पोस्टमुळे मुग्धा चर्चेत आली आहे. मात्र आता त्याचे कारण प्रथमेश नसून तिचे वडील आहेत.
View this post on Instagram
मुग्धाचे वडील भगवान वैशंपायन सेवानिवृत्त झाले आहेत. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी त्यांचा सेवानिवृत्ती समारंभ झाला तेव्हा तिने वडिलांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमाला जाताना एक व्हिडीओ आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती स्वतः गाडी चालवताना दिसत आहे. आपल्या चाहत्यांसोबत बोलताना तिला होत असलेला आनंद तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. कार्यक्रमात त्यांचा सन्मान चिन्ह शाल श्रीफळ देऊन सन्मान केला जाताना दिसत आहे. त्यानंतर ते आपल्या डिपार्टमेंट कडे जातात तेव्हा त्यांच्यासोबत काम करणारे त्यांचे सहकारी मुग्धाच्या वडिलांच्या रिटायरमेंट मुळे भाऊक झालेले पाहायला मिळतात. आणि शेवटी ते आपले मनोगत व्यक्त करतांना मुग्धा आणि तिची आई भावूक होताना दिसत आहे. हा व्हिडिओ चाहत्यांना आवडला असून काहींनी अभिनंदन केले तर काहींनी पुढील आयुष्यासाठी मुग्धाच्या वडिलांना शुभेच्छा दिल्या.
View this post on Instagram
व्हिडीओच्या माध्यमातून मुग्धाने लिहिले कि, ‘३० नोव्हेंबर २०२३.
बाबा गेली सुमारे ३३ वर्ष नागोठणे येथील IPCL / रिलायंस इंडस्ट्रीस मध्ये कार्यरत होते. सलग ३३ वर्ष एकाच ठिकाणी, एकाच प्लांट मध्ये कार्यरत असल्यामुळे त्यांचं आणि आमचं सुद्धा कंपनी बरोबर भावनिक नातं होतं, आजही आहे..
३० नोव्हेंबर ला बाबा रिटायर झाले.. त्या दिवसाचे काही भावनिक क्षण शेअर करते आहे.. 🥹❤️’