आज अक्षय्य तृतीयाच्या मुहूर्तावर आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री ज्ञानदा रामतीर्थकर (Dnyanada Ramtirthkar) हिने तिच्या आगामी सिनेमाची घोषणा केली.
या शुभ दिनी सिद्धिविनायकाच्या चरणाशी ‘मुंबई लोकल’ या सिनेमाचे पोस्टर लाँच करण्यात आले.
मुंबई लोकलमध्ये ज्ञानदासह अभिनेता प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप देखील झळकणार आहेत.
त्याशिवाय मनमीत पेम, वनिता खरात, अभिजीत चव्हाण, अनिकेत केळकर, संजय खापरे, संजय कुलकर्णी, स्मिता डोंगरे हे कलाकार देखील आपल्याला या सिनेमात पाहायला मिळणार आहेत.
या आगामी सिनेमात लोकलमध्ये घडणारी एक मनोरंजक कहाणी आणि अबोल प्रेम कथा पाहायला मिळणार आहे.
या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजित करत असून, पोस्टर लाँचचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
ज्ञानदा, प्रथमेश आणि पृथ्वीक यांचा हा मुंबई लोकल प्रवास प्रेक्षकांच्या कधी भेटीला येणार याचीच सारेजण वाट पाहत आहेत.