बॉलिवूडमधील द यंग मॅन म्हणजेच अभिनेता अनिल कपूर. अनिल कपूर यांनी आतापर्यंत अनेक दमदार सिनेमांमध्ये काम केले आहे. अनिल यांनी १९७९ मध्ये हमारे तुम्हारे या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पण या सिनेमात त्यांचा रोल हा फारच छोटा होता. यानंतर अनिल यांनी तमिळ सिनेमात लीड रोल केला. त्यांनतर कन्नड सिनेमात देखील त्यांनी लीड रोल केला. हे करत असताना अनिल हे अनेक बॉलिवूड सिनेमात छोटे मोठे रोल करत होते. पण १९८३ साली प्रदर्शित झालेल्या ‘वो ७ दिन’ या सिनेमात त्यांनी मुख्य अभिनेत्याची भूमिका साकारली. त्यानंतर अनिल यांनी अनेक हिंदी सिनेमांमध्ये काम केले. ९० च्या दशकात त्यांचे जवळपास सर्वच सिनेमे हिट झाले होते. आज अनिल कपूर याचं वय हे ६७ आहे, तरीही ते तितक्याच जिद्दीने आजही काम करत आहेत.
२००१ साली आलेल्या दिग्दर्शक एस. शंकर यांच्या नायक या सिनेमाने अनिल कपूर यांना आणखीनच प्रसिद्धी मिळाली होती. हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. यामध्ये अनिल कपूर मुख्य भूमिकेत दिसले होते. त्यांच्या सोबतच राणी मुखर्जी, परेश रावल, शिवाजी साठम, अमरीश पुरी, नीना कुलकर्णी, जॉनी लिवर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. राजकारणामध्ये होणारा ड्रामा, तिथे होणारे घोटाळे या सगळ्यांवर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरला होता. सिनेमा प्रदर्शित होऊन २३ वर्ष उलटून गेले आहेत. तरीही आजही प्रेक्षक तितक्याच आवडीने हा सिनेमा पाहतात. टॉलिवूडमधील मधूलवन या सिनेमाचा हा रिमेक आहे.
तर आता अशी खबर आली आहे की, नायक या सिनेमाचा दुसरा भाग येणार आहे. आपल्या आवडत्या सिनेमाचा दुसरा भाग येणार म्हंटल्यावर प्रेक्षक देखील खुश होतात. अशातच नायक या सिनेमा चाहता वर्ग देखील मोठा आहे. नुकतच नायक सिनेमाचे दिग्दर्शक एस. शंकर यांनी अनिल कपूर यांच्या मुंबईतील घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी बराच वेळ या दोघांमध्ये चर्चा सुरु होती. यामुळे नायक या सिनेमाचा आता दुसरा भाग येणार अशी चर्चा रंगली आहे. यावेळी या दोघांमध्ये बराच वेळ चर्चा सुरु होती. त्यामुळे दिग्दर्शक शंकर हे कदाचित नायक २ या सिनेमाची स्क्रिप्ट अनिल यांना दाखवण्यासाठी आले आहेत. असं देखील बोलल जात आहे.
त्यामुळे आता खरंच नायक सिनेमाचा दुसरा भाग येणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.