अभिनेत्री विद्या बालन (Vidya Balan) ही नेहमीच नवनवीन विषय असलेले सिनेमे घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येते. तिचा प्रत्येक सिनेमा हा एक वेगळी कथा, वेगळे विचार मांडणारा असतो. तिच्या उत्तम अभिनयाने तिने प्रेक्षकांवर एक वेगळीच जादू केली आहे. तिचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून विद्या ही ‘भूल भुल्लया ३’ या सिनेमामुळे चर्चेत आहेत. भूल भुल्लय्याच्या पहिल्या भागात विद्याने महत्त्वाची भूमिका साकारली होती., त्यानंतर दुसऱ्या भागात ती दिसली नव्हती. त्यामुळे प्रेक्षक जरा नाराज झाले होते. मात्र भूल भुल्लया ३ मध्ये विद्या दिसणार हे पाहून तिचे चाहते प्रचंड उत्सुक झाले आहेत.
पण आता विद्या एकदा एका वेगळ्या कारणांमुळे चर्चेत आली आहे. नुकतच विद्याच्या ‘दो और दो प्यार’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या सिनेमात विद्यासोबतच स्कॅम १९९३ फेम प्रसिद्ध अभिनेता प्रतिक गांधी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्यांच्यासोबतच अभिनेत्री इलियाना डिक्रुझ आणि अभिनेता सेंधील राममूर्ती देखील दिसणार आहेत. या सिनेमाचा ट्रेलर विद्याने तिच्या सोशल मिडीयावर शेअर केला. यामध्ये विद्या आणि प्रतिक हे दोघे नवरा बायको दाखवले आहेत. या दोघांमध्ये प्रचंड भांडण होताना दाखवली आहेत. त्यांनतर दोघांचे ही बाहेर अफेर सुरु होते. प्रतिकच इलियानासोबत आणि विद्याच सेंधीलसोबत अफेर सुरु होत. त्यानंतर प्रतिक आणि विद्या एका ट्रीपवर जातात आणि पुन्हा त्यांच्यातील जवळीक वाढताना दाखवली आहे. मात्र नंतर इलियाना ती प्रेग्नेंट असल्याचं प्रतिकला सांगते. आणि हे ऐकून प्रतिक मात्र आश्चर्यचकित होतो. या सिनेमासाठी विद्याने वजन घटवल्याचे दिसून येत आहे.
View this post on Instagram
विद्या आणि प्रतिकच्या या सिनेमाचा दमदार ट्रेलर सगळ्यांनाच प्रचंड आवडत आहे. विद्याने टाकलेल्या या तिच्या ट्रेलरवर चाहते भरभरून कमेंट करत विद्याचं आणि प्रतिकचं कौतुक करत आहेत. एकाने कमेंट केली आहे की, “आम्ही हा सिनेमा पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहोत.” तर दुसऱ्याने म्हटलं आहे, “प्रतिक गांधी हा एक उत्तम अभिनेता आहे, तो इथे झळकण्यासाठीचं आला आहे.” त्यामुळे चाहते देखील हा सिनेमा पाहण्यासाठी प्रचंड उत्सुक आहेत. श्रीर्षा ठाकुर्ता हिने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. येत्या १९ एप्रिलला हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान विद्या ही भूल भुल्लयाच्या शुटींगमध्ये व्यस्त आहे, तर प्रतिक नुकताच कुणाल खेमुच्या ‘मडगाव एक्स्प्रेस’मध्ये दिसला होता.