बॉलिवूडची डिंपल गर्ल म्हणजेच आपल्या सगळ्यांची आवडती आणि प्रसिद्ध अभिनेत्री ‘प्रीती झिंटा’ (Preity Zinta). १९९८ साली ‘दिल से’ या सिनेमातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर सौंदर्याची आणि अभिनयाची जादू तिने प्रेक्षकांवर केली. तिचा चाहता वर्ग देखील प्रचंड मोठा आहे. प्रीतीने आतापर्यंत कल हो ना हो, वीर झारा, कोई मिल गया, दिल है तुम्हारा यांसारखे अनेक दमदार सिनेमे सिनेसृष्टीला दिले आहेत.
आता जवळजवळ ६ वर्षानंतर प्रीती पुन्हा एकदा बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ‘प्रीती झिंटा’ (Preity Zinta) लवकरच ‘लाहोर १९४७’ या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाच्या शुटींगला सुरवात झाली आहे. प्रीतीने ही माहिती तिच्या इंस्टाग्रामवरून दिली आहे. शुटींगच्या पहिल्या दिवसाचे फोटो तिने शेअर केले आहेत. बऱ्याच वर्षांनंतर प्रीती पुन्हा एकदा अभिनेता सनी देओलसोबत दिसणार आहे. या सिनेमात सनीदेखील मुख्य भूमिकेत दिसणार असून, या आधी या दोघांनी फर्ज, द हिरो, भैय्याजी सुपरस्टार या सिनेमात एकत्र काम केले होते. तर आता पुन्हा एकदा हे दोघ एकत्र दिसणार आहेत त्यामुळे चाहते प्रचंड खुश झाले आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन दिग्दर्शक राजकुमार संतोषी करणार आहेत. तसेच सिनेमाचा निर्माता अमीर खान असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच अमीर खान आणि सनी देओल हे दोघे एकत्र काम करणार आहेत.
View this post on Instagram
२०१८ साली आलेल्या वेलकम टू न्युयॉर्क आणि भैय्याजी सुपरस्टार या सिनेमात प्रीती शेवटची दिसली होती. त्यानंतर तिने ६ वर्ष ब्रेक घेतला होता. प्रीती लग्नानंतर अमेरिकेत शिफ्ट झाली होती. पण गेले काही दिवस झालं ती ‘IPL’च्या सामन्यांमुळे भारतात आहे. तर आता तिने पुन्हा एकदा तिचा मोर्चा सिनेमांकडे वळवला आहे. पण तिला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाह्ण्यासाठी चाहते प्रचंड खुश झाले आहेत.
२०१६ साली प्रीती तिचा बॉयफ्रेंड जीन गुडईनफसोबत लग्नबंधनात अडकली. जीन हा प्रीती पेक्षा १० वर्षांनी लहान आहे. प्रीतीने सरोगसी पद्धतीने दोन जुळ्या मुलींना जन्म दिला.