आपल्या आवडत्या अभिनेत्री आणि अभिनेत्यासोबत काम करण्याची प्रत्येक कलाकाराची इच्छा असते. मग ते हॉलिवूड असुदेत किंवा बॉलिवूड. जो कलाकार आपल्याला आवडतो, ज्या कलाकाराला आपण रोल मॉडल मानतो अश्या व्यक्ती सोबत काम करायला मिळणं ही देखील भाग्याची गोष्ट असते. असे अनेक कलाकार असतात ज्यांना ही संधी मिळते, अशीच एक इच्छा आपल्या मराठमोळ्या अभिनेत्रीने व्यक्त केली आहे.
ती म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी अभिनेत्री सई ताम्हणकर(Sai Tamhankar). सईने आपल्या अभिनयाच्या जोरावर फक्त मराठीचं नाही तर हिंदी सिनेसृष्टीत देखील स्वतःच असं वेगळ स्थान निर्माण केलं आहे. सई ही मराठी सिनेसृष्टीतील एक सुंदर आणि बोल्ड अभिनेत्री आहे. ती तिच्या युनिक स्टाईलमुळे नेहमीच चर्चेत असते. सईने आतापर्यंत अनेक दमदार सिनेमे मराठी सिनेसृष्टीला दिले आहेत, तिच्या उत्तम अभिनयामुळे चाहते नेहमीच तिच्यावर खुश असतात. दुनियादारी, वजनदार, प्यारवाली लव्हस्टोरी, क्लासमेट, तू ही रे यांसारख्या अनेक सिनेमांमधून सईने तिच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर केली आहे. मराठीसोबतच सईने बॉलिवूडमध्ये देखील तिच्या अभिनयाचा चांगलाच ठसा उमटवला आहे. सई बॉलिवूडच्या मिमी या सिनेमात अभिनेत्री क्रिती सेनॉनसोबत झळकली होती. तिचं या सिनेमातील काम सगळ्यांनाच प्रचंड आवडलं, तिला या सिनेमातील भूमिकेसाठी फिल्मफेअर देखील मिळाला होता. काही दिवसांपूर्वीच सई ‘श्रीदेवी प्रसन्न’ या सिनेमात अभिनेता सिध्दार्थ चांदेकरसोबत झळकली होती. मात्र या सिनेमाला म्हणावा तितका प्रतिसाद मिळाला नाही.
नुकतच एका मुलाखती दरम्यान सईने तिला बॉलिवूडमधील एका अभिनेत्यासोबत काम करायचं आहे अशी इच्छा व्यक्त केली. तुला कोणत्या अभिनेत्यासोबत आणि दिग्दर्शकासोबत काम करण्याची इच्छा आहे? असा प्रश्न तिला विचारण्यात आला, त्यावेळी सई म्हणाली, “रणवीर सिंह, नागराज मंजुळे, अनुराग कश्यप आणि श्रीराम राघवन”. पुढे तिला रणवीरच्या बहिणीची भूमिका करायला आवडेल का? असं विचारलं त्यावर ती म्हणाली, “नाही, पण भूमिका कशी आहे त्यावर अवलंबून आहे, वहिनी किंवा बहिणीची भूमिका असली तरी भूमिकेवर सगळ अवलंबून आहे.” त्यांनतर सईला तुला आयुष्यभर एकाच अभिनेत्यासोबत काम करण्याची संधी मिळाली तर तो कोण असेल? यावर ती म्हणाली “ललित प्रभाकर”.
सईच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, सई लवकरच इम्रान हाश्मी आणि प्रतिक गांधी यांच्यासोबत ‘झिरो ग्राउंड’ या सिनेमात झळकणार आहे.