अॅटली कुमार यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘जवान’ या सिनेमाची क्रेझ चाहत्यांमध्ये चांगलीच दिसत आहे. या सिनेमामध्ये बॉलिवूडचा किंग शाहरुख खान हा दुहेरी भूमिकेत आहे.
शाहरुख मुख्य भूमिकेत असलेला जवान प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या सिनेमातील कलाकारांचे देखील सर्वत्र कौतुक होत आहे. शाहरुखने या सिनेमामध्ये पोलिस व सैनिक अशी दुहेरी भूमिका साकारली असून बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने चांगलीच कमाई केली आहे.
जवान सिनेमामध्ये किंग शाहरुख खान सोबत नयनतारा व विजय सेतुपती हे मुख्य भूमिकेत आहे. तसेच दीपिका, सान्या मल्होत्रा यांसारख्या अनेक अभिनेत्री या सिनेमात झाळकल्या आहेत. हा सिनेमा प्रदर्शित होऊन एक महिना झाला असला, तरी अजूनही ह्या सिनेमाची क्रेझ प्रेक्षकांमध्ये पहिल्या दिवसा सारखीच आहे. चाहते पुन्हा-पुन्हा हा सिनेमा पाहण्यासाठी सिनेमगृहात जात आहेत. जरी या सिनेमाला भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला नसला, तरी मात्र हा सिनेमा परदेशात चांगलीच कमाई करत आहे.
अॅटली कुमार यांनी नुकतीच ‘जवान’च्या कमाईबद्दल खास पोस्ट शेअर केली आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिले की, “जवान हा सिनेमा प्रत्येक दिवशी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तिकीट बूक करा. ‘जवान’ हा सिनेमा सिनेमागृहात जाऊनच पाहा-हिंदी, तामिळ आणि तेलगु भाषेत.” ‘जवान’ने जगभरात ११०३.६ कोटींची कमाई केली आहे.
View this post on Instagram
विक्रम राठोड व त्याच्या मुलाची भूमिका शाहरुखणे अगदी उत्तम पद्धतीने साकारली असून विक्रम राठोड आणि त्याच्या मुलाच्या गोष्टीने जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या सिनेमाने जगभारत ११०३.६ कोटींची कमाई करत नवीन इतिहास रचला आहे. २०२३ या वर्षातला ‘जवान’ सिनेमा हा सर्वाधिक कमाई करणार बॉलिवूडचा सिनेमा ठरला आहे.