सध्याचा सर्वाधिक लोकप्रिय सिनेमा म्हणजे ‘ॲनिमल.’ त्यामुळे थिएटरमध्ये सिनेमा पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक गर्दी करत आहेत. काहीजण त्यांच्या जोडीदारसोबत, तर काही त्यांच्या मित्रमैत्रिणींसह तर काही आपल्या कुटुंबियांसोबत सिनेमा पाहायला जात आहेत. सुरुवातीला ‘ॲनिमल’ हा सिनेमा कुटुंबासोबत बघू शकता असं सांगण्यात आलं. पण झालं उलटंच. हा सिनेमा आता ‘कुटुंबासोबत पाहातच येणार नाही…’ अशा चर्चा आहेत.
ॲनिमल सिनेमातील रणबीर कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्या इंटिमेट सीनची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. सिनेमाची आणि दोघांच्या इंटिमेट सीनची चर्चा चाहत्यांमध्ये संपता संपत नाहीये. ॲनिमल सिनेमातील तृप्ती डिमरीच्या व्यक्तिरेखेची खूप चर्चा होत आहे. या सिनेमापूर्वी पासूनच तृप्ती नॅशनल क्रश म्हणून ओळखली जात आहे. पण आता या सिनेमामुळे तिच्या प्रसिद्धीत कमालीची भर पडली आहे. तिच्या इंस्टाग्रामवरील फॉलोवर्समध्ये देखील प्रचंड प्रमाणात वाढ झाली.
बॉक्स ऑफिसवरील सिनेमाची कमाई पाहाता, प्रेक्षक सिनेमा पाहाण्यासाठी सिनेगृहात गर्दी करत आहेत, तर दुसरीकडे रणबीर कपूर आणि अभिनेत्री तृप्ती डिमरी यांचा इंटिमेट सीन सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
तृप्ती डिमरीने ॲनिमलमध्ये काही इंटिमेट सीन्स दिले आहेत. सिनेमातील तिची भूमिका खूपच छोटी आहे मात्र तिची रणबीर कपूरसोबतची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली. सिनेमामध्ये तिने रणबीर सोबत दिलेले इंटिमेट सीन पाहून सर्वजण आश्चर्य व्यक्त करत आहेत. एवढेच नाही तर तृप्तीच्या आईवडिलांनी देखील तिच्या या सीन्सवर आता प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील वाचा : मित्र-मैत्रीणींसोबत मुग्धाने लुटला ‘Bride To Be’ सेलिब्रेशनचा आनंद
नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तृप्तीने सांगितले की तिच्या आईवडिलांनी ‘ॲनिमल’ हा सिनेमा पहिला आणि त्यांना आश्चर्याचा धक्का बसला. रणबीर सोबतच्या इंटिमेट सीन्स त्यांना माझ्याकडून अपेक्षित नव्हते. या विषयी बोलताना तृप्ती म्हणाली, “माझ्या आईवडिलांना जरा धक्का बसला. ते मला म्हणाले, आम्ही सिनेमांमध्ये असे काही पाहिले नव्हते आणि तू सुद्धा अशी कोणती भूमिका साकारली नव्हतीस. त्या सीन्सच्या विचारांतून बाहेर पडण्यास त्यांना थोडा वेळ लागला. पण त्यांनी मला समजून घेतले. ते म्हणाले की तू हे सीन्स नव्हते करायचे, पण ठीक आहे. पालक म्हणून आम्हाला असे वाटणे स्वाभाविक आहे.”
तृप्तीने तिच्या पालकांना समजावून सांगताना ती म्हणाली की, “मी त्यांना म्हणाले की मी काहीच चुकीचे करत नाहीये. हे माझे काम आहे आणि जोपर्यंत मी कम्फर्टेबल, सुरक्षित आहे, तोपर्यंत मला असे सीन्स करण्याबद्दल काहीच समस्या नसेल. मी एक अभिनेत्री आहे आणि मला भूमिकेसाठी १०० टक्के प्रयत्न करावे लागतील. मी या चित्रपटासाठी तेच केले.”
तसेच हा सीन शूट करतावेळी रणबीर कपूर व संदीप यांनी तृप्तीला कोणताही अस्वस्थपणा वाटणार नाही याची पूर्णपणे खबरदारी घेतली होती. असेही तिने सांगितले. पण काही प्रेक्षक मात्र हा सीन पाहताना अवस्थ होत आहेत, हे खरं.