सई ताम्हणकर हिचा २ फेब्रुवारी रोजी श्रीदेवी प्रसन्न हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला.

महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून सई प्रेक्षकांना भेटायला येत असते.

सई नेहमी वेगवेगळ्या भूमिका करून आपल्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते.

श्रीदेवी प्रसन्न चित्रपटात झळकल्यानंतर सईनं पुन्हा एकदा प्रेक्षकांची मन जिंकली आहे.

नेटफ्लिक्सवर नुकताच प्रदर्शित झालेल्या 'भक्षक' या चित्रपटात सई झळकली आहे.

या चित्रपटात सईने जस्मीत गौर या एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे.

“बॉक्स ऑफिस कलेक्शनच्या पलीकडे जाऊन एखाद्या अभिनेत्याने असे प्रोजेक्ट करावे, हे खूप दुर्मिळ आहे. मी या चित्रपटाचा भाग बनले याचा मला अभिमान वाटतो”, असं सई म्हणते.