मराठीसह हिंदीमध्ये सुध्दा आपल्या अभिनयाने नावारूपाला आलेली अभिनेत्री म्हणजे अमृता खानविलकर.

हटके फोटोशूट, वैयक्तिक आयुष्यातील घडामोडी यामुळे अमृता नेहमी चर्चेत असते.

आता आपल्या नवीन येणाऱ्या वेब सिरीजमुळे अमृता पुन्हा चर्चेचा विषय बनली आहे.

मलंग आणि राजी या हिंदी चित्रपटात झळकल्यानंतर अमृता एका हिंदी वेब सिरीजमध्ये दिसणार आहे.

या वेब सिरीजचे नाव 'लुटेरे' असून दिग्दर्शन कमल जय मेहता यांनी केले आहे.

लुटेरे' मध्ये अमृता अनेक दिग्गज बॉलिवूड मधल्या कलाकारांच्या सोबतीने दिसणार आहे

लुटुरे ही एक क्राईम थ्रिलर वेब सिरीज असून येत्या 22 मार्चला Hotstar वर प्रदर्शित होणार आहे.

खूप दिवसांनी एक क्राईम थ्रिलर वेब सीरिजमध्ये काम करताना खूप आनंद होतोय, असे अमृता म्हणते.