मराठी सिनेसृष्टी पाठोपाठ आता बॉलिवूडमध्ये देखील ऐतिहासिक सिनेमांची सरबत्ती सुरु आहे.

ऐतिहासिक सिनेमा म्हंटलं की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संबधितच कोणता तरी सिनेमा असणार हे आपसूकच मनात येते.

दिग्दर्शक अमित राय आता लवकरच शिवरायांवर आधारित नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेतून येत आहेत.

महाराजांवर सिनेमा असला की, छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याकडे साऱ्यांचेच लक्ष वेधलेले असते.

यापूर्वी बॉलिवूडमधील काही अभिनेत्यांनी देखील सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

महेश मांजरेकर यांच्या ‘वेडात वीर दौडले सात’ या सिनेमात अभिनेता ‘अक्षय कुमार’ हा लवकरच महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

तान्हाजी या सिनेमात अभिनेते शरद केळकर यांनी देखील शिवाजी महाराजांची भूमिका वठवली आहे.

तर त्या पाठोपाठ अमित राय यांच्या सिनेमात अभिनेता ‘शाहीद कपूर’ छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.