‘आई कुठे काय करते’ मालिकेत ‘संजना’ हे पात्र साकारून रुपाली घराघरात पोहचली.

सोशल मीडियावर रुपालीचा मोठा चाहता वर्ग आहे.

नुकतंच रुपालीने फोटोशूट केलं आहे. याचे फोटो तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत.

फोटोमध्ये रुपालीने जांभळ्या रंगाची खणाची नऊवारी साडीतील black-and-white फोटो शेअर केले आहेत.

केसांत गुलाबाची फुलं माळल्यामुळे रुपालीचं सौंदर्य खुलून दिसत आहे.

साजेसा मेकअप आणि ज्वेलरीने मराठमोळा साज केला आहे.

पारंपारिक पेहरावातील रुपालीचे हे फोटो चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहेत.