रंगभूमीवरून अभिनय कारकिर्दीला सुरुवात करून उत्कृष्ट अभिनयाने सिनेसृष्टीत वेगळा ठसा उमटवणारी मराठमोळी अभिनेत्री म्हणजे  ‘मधुरा वेलणकर.’

मधुरा ही अभिनेता आणि दिग्दर्शक अभिजीत साटम याची पत्नी तर  शिवाजी साटम यांची सून आहे.

मधुराने आजवर तब्बल ७५ हून अधिक मालिकांमध्ये काम केले असून गोजिरी, सात जन्माच्या गाठी, अनामिका, चक्रव्यूह या तिच्या गाजलेल्या मालिका.

सरीवर सरी, मातीच्या चुली,  नॉट ओन्ली मिसेस राऊत, खबरदार, उलाढाल या मधुराच्या सिनेमांना देखील चांगलीच लोकप्रियता मिळाली.

२०१९ साली मधुराने तिच्या वाढदिवसानिमित्त ‘मधुरव’ हे पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकातून हरहुन्नरी अभिनेत्री संवेदनशील लेखिका म्हणून नावारूपाला आली.

कोरोना काळात 'मधुरव' या नाट्यकृतीचे अनेक ऑनलाईन प्रयोग झाले. अन् त्यानंतर ‘मधुरव- बोरू ते ब्लॉग’ ही आगळीवेगळी नाट्यकृती रंगमंचावरून प्रेक्षकांच्या समोर आली.

तब्बल १२ वर्षांनी मधुरा  ‘तुमची मुलगी काय करते’ या मालिकेतून पुन्हा अभिनयाकडे वळली.

मधुराच्या या अष्टपैलू कामगिरीसाठी आजवर तिला अनेक मानाच्या पुरस्कारांनी गौरविले आहे.

चाळीशी उलटून गेली तरी आजही आपल्या ग्रेसफुल लूकने आणि कौतुकास्पद कामगिरीने मधुरा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करीत आहे.