आपल्या सर्वांची लाडकी अभिनेत्री पूजा सावंत लग्नाच्या बंधनात अडकली आहे.

गेले काही दिवस पूजा आणि सिद्धेशच्या लग्न विधीच्या फोटोने सोशल मिडीयावर धुमाकूळ घातला होता .

व्याही भोजन, साखरपुडा, हळद, मेहंदी या समारंभाचे फोटोज आणि व्हिडीओ सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत होते.

यामध्ये साखरपुड्याला पुजा आणि सिद्धेशने सेम कपडे घातले होते. यामध्ये पूजाने सफेद रंगाचा लेहंगा तर सिद्धेशने शेरवानी परिधान केला होता.

तर संगीतच्या कार्यक्रमात पूजाने Brown रंगांचा लेहंगा तर सिद्धेशने black आणि white रंगाचा थ्री पीस परिधान केला होता.

मेहंदीमध्ये पूजाने कलरफुल असा लेहंगा तर सिद्धेशने Off white रंगाचा कुर्ता परिधान केला होता.

हळदीमध्ये पूजाने पिवळा रंगाचा नाही तर जांभळा रंगाचा लेहंगा आणि सिद्धेशने सेम रंगांचा कुर्ता परिधान केला होता.

लग्नानंतर पूजा आणि सिद्धेशने लग्न झाल्यानंतर Mr. and Mrs चव्हाण म्हणून हजेरी लावली.

यावेळेस पूजाने रांग रंगाची साडी तर सिद्धेशने काळा रंगांची शेरवानी परिधान केली होती.