टीआरपीच्या शर्यतीत 'ठरलं तर मग' या मालिकेने पहिला क्रमांक पटकावत ६.९ रेटिंग मिळवले आहे.

'तुझेच मी गीत गात आहे' ही मालिका दुसऱ्या क्रमांकावर असून या मालिकेला ६.५ रेटिंग मिळाले आहे.

नुकतीच प्रदर्शित झालेली तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेने ६.४ रेटिंग मिळवत यादीत तिसरे स्थान संपादित केले.

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका चौथ्या क्रमांकावर असून या मालिकेला ६.३ रेटिंग आहेत.

पाचव्या क्रमांकावर असलेली 'आई कुठे काय करते' या मालिकेला ५.७ रेटिंग मिळाले आहे.

'कुन्या राजाची गं तू रानी' ही मालिका सहाव्या स्थानावर असून ५.० रेटिंग आहे.

लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणारी 'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेला ५.० रेटिंग मिळवत सातव्या क्रमांकावर आहे.

‘मन धागा धागा जोडते नवा' ही मालिका आठव्या क्रमांकावर असून या मालिकेला ४.५ रेटिंग मिळाले आहे.

नवव्या क्रमांकावर असलेली 'शुभविवाह' या मालिकेला ४.० रेटिंग मिळाले आहे.

अल्पावधीत प्रेक्षकांचं मन जिंकून घेणारी 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका 3.९ रेटिंगमुळे दहाव्या क्रमांकावर आहे.